भारतीय रस्त्यांवर एकेकाळी अधिराज्य गाजवणारी Bajaj Chetak स्कूटर पुन्हा एकदा आपल्या विद्युत स्वरूपात बाजी मारत आहे. 70-90 च्या दशकात अनेक कुटुंबांची पहिली पसंती असणारी चेतक, आता Electric Scooter सेगमेंटमध्ये एक नवा इतिहास रचत आहे. 2025 च्या चौथ्या तिमाहीत म्हणजेच Q4 FY25 मध्ये चेतकने 29% मार्केट शेअर मिळवत भारतात सर्वाधिक विक्री झालेली इलेक्ट्रिक स्कूटर बनली आहे.
नवे वेरिएंट्स, तगडी रेंज आणि आधुनिक फीचर्स
Bajaj Auto ने 2024 मध्ये चेतकचे दोन नवे वेरिएंट बाजारात आणले त्यातील एक म्हणजे Bajaj Chetak 35 Series. यात आता 3.5 kWh ची फ्लोअरबोर्डखाली बसवलेली बॅटरी आहे, जी एका चार्जमध्ये 153 किमी इतकी रेंज देते. याशिवाय, यात 35 लिटरचं अंडरसीट स्टोरेज सुद्धा आहे, जे दैनंदिन वापरासाठी खूप उपयुक्त ठरतं. फ्लॅगशिप व्हेरिएंट Bajaj Chetak 3501 मध्ये तर भन्नाट फीचर्स मिळतात एक 5-इंच TFT टचस्क्रीन डिस्प्ले, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, म्युझिक कंट्रोल्स, मॅप्स, डॉक्युमेंट स्टोरेज, आणि जिओ-फेन्सिंग पर्यंत सगळं काही नवा 950W ऑन-बोर्ड फास्ट चार्जर वापरून ही स्कूटर 0 ते 100% फक्त 3 तासांत चार्ज होते म्हणजेच एक दुपारी चार्ज लावली, की संध्याकाळी मस्त फेरफटका!
महाराष्ट्रमध्ये अर्धा बाजार चेतकचा Bajaj Chetak
महाराष्ट्रसारख्या मोठ्या आणि EV अनुकूल राज्यात, चेतकने तब्बल 50% इलेक्ट्रिक स्कूटर मार्केट ताब्यात घेतलं आहे. आणि हे शक्य झालंय Bajaj Auto च्या 3,800+ विक्री व सर्व्हिस नेटवर्कमुळे. त्यामुळे शहर असो किंवा लहान गाव, चेतक सर्वत्र पोहोचली आहे. 2024 मध्येच चेतकच्या 2 लाख युनिट्स विकल्या गेल्या आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे.
क्लासिक लूकला दिला मॉडर्न टच
नवीन Bajaj Chetak काही सॉफ्ट व्हिज्युअल अपडेट्स दिले गेले आहेत जसे की ब्लॅक हेडलाईट सराउंड, अधिक शार्प टर्न इंडिकेटर्स, आणि आकर्षक LED टेललॅम्प. पण या सर्वांमध्ये तिचा क्लासिक स्टाइल अजिबात गमावलेला नाही. आजही ही स्कूटर पाहिली, की जुन्या आठवणी जाग्या होतात पण आता त्या नव्या रूपात.
स्वच्छ इंधन क्षेत्रातही बाजाजचा दबदबा
फक्त इलेक्ट्रिक नाही, तर CNG + Electric Vehicles च्या संपूर्ण श्रेणीत Bajaj Auto ने 28% मार्केट शेअर मिळवला आहे. 2001 मध्ये पहिली CNG थ्री-व्हीलर देणारा ब्रँड आता Bajaj Freedom (CNG मोटरसायकल) आणि Bajaj GoGo Electric 3-Wheeler सारख्या नव्या उत्पादनांसह पुन्हा आघाडीवर आहे.
आजच्या घडीला Bajaj Chetak देशांतर्गत उत्पन्नात 40% हिस्सा EV आणि CNG वाहनांचा आहे म्हणजेच हे भविष्यातलं नाही, तर वर्तमानातलं यश आहे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती सार्वजनिक स्त्रोतांवर आधारित असून, काही स्पेसिफिक फीचर्स व किंमती वेगवेगळ्या वेरिएंटनुसार बदलू शकतात. कृपया अधिकृत डीलरकडून किंवा वेबसाईटवरून खात्री करून घ्यावी.
देखील वाचा:
Bajaj Discover 2025 मायलेजचा बादशाह परतला 70kmpl ने
Bajaj Pulsar NS125: मायलेज, स्टाईल आणि दमदार परफॉर्मन्सची जबरदस्त कॉम्बिनेशन
Bajaj Platina 100: जबरदस्त मायलेज आणि किफायतशीर किंमतीतील परफेक्ट बाइक