Samsung Galaxy F55 5G: हा फोन झाला तीन हजार रुपयांनी स्वस्त जाणून घ्या काय आहे ऑफर !

Published on:

Follow Us

DailyNews24

Stay Updated With the Latest News Anytime, Anywhere!

Samsung Galaxy F55 5G :  आता फ्लिपकार्टवर Samsung Galaxy F55 5G खरेदीवर मिळणार मोठी सूट !

Samsung Galaxy F55 5G

तर तुम्हाला सुद्धा ₹20,000 ते ₹25,000 रुपयापर्यंत असणारा Samsung चा स्मार्टफोन खरेदी करायचं असेल, तर Flipkart वर जबरदस्त ऑफर ठेवण्यात आली आहे. Samsung Galaxy F55 5G च्या 8GB रॅम असणाऱ्या व 256 GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ₹23,999 रुपये आहे. परंतु आता, फ्लिपकार्ट वर देण्यात आलेला ऑफर द्वारे तुम्ही हा फोन ₹3,000 च्या बँक डिस्काउंटसह खरेदी करू शकता. यासोबतच कार्ड ॲक्सिस बँक (Flipkart Axis Bank) च्या कार्डने पेमेंट केल्यावर 5% कॅशबॅक सुद्धा देण्यात येणार आहे.

एक्सचेंज ऑफर आणि डिस्काउंट ऑफर :

Samsung Galaxy F55 5G

या ऑफर मधली एक विशेष गोष्ट म्हणजे एक्सचेंज ऑफर. या ऑफर मध्ये तुम्हाला जुन्या फोनच्या एक्सचेंजवर हा स्मार्टफोन ₹14,800 पर्यंतच्या सवलतीत खरेदी करता येणार आहे. परंतु यामध्ये देखील, ही सूट जुन्या फोनची स्थिती, ब्रँड आणि Flipkart ची एक्सचेंज पॉलिसी यावर अवलंबून असणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या फोनचे स्पेसिफिकेशन्स.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स :

फोन 12GB पर्यंत रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज पर्यायांसह उपलब्ध आहे. यात Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे.

या फोनमध्ये 1080 x 2400 पिक्सल रिझोल्यूशनसह 6.7-इंचाचा Full HD+ Super AMOLED Plus डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो आणि त्याचा पीक ब्राइटनेस 1000 निट्स आहे.

कॅमेरा :

फोटोग्राफी करिता या फोनमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा बसवण्यात आला आहे, ज्यामध्ये 5MP अल्ट्रावाइड कॅमेरा, आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी करिता 50MP फ्रंट कॅमेरा मिळतो.

बॅटरी :

फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, Android 14 बेस्ड OneUI 6.1, आणि IP67 डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट रेटिंग यांसारखी वैशिष्ट्ये या फोनमध्ये आहेत. उत्कृष्ट साउंडसाठी Dolby Atmos स्टीरिओ स्पीकर्स देण्यात आले आहेत.

Dailynews24 App Download

Dailynews24 App :

देश, शिक्षण, मनोरंजन, व्यवसाय अपडेट्स, धर्म, क्रिकेट, जन्मकुंडली याबद्दलच्या ताज्या बातम्या वाचा आणि दररोजच्या हिंदी बातम्या आणि व्हिडिओ लघु बातम्या कव्हरेजसाठी येथे डाउनलोड करा.

Open App
Responsive Sticky Footer Ad (70px Height)