Driving License Download Online: तुम्हाला सुद्धा घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड करायचे आहे

Published on:

Follow Us

तुम्हाला सुद्धा घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड करायचे आहे ? तर काळजी करू नका ; कारण आजच्या या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला कोण कोणत्या वेबसाईटवरून लायसन्स डाऊनलोड करता येईल, याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

भारतात काही महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी वाहन चालवण्यासाठी लागणारे ड्रायव्हिंग लायसन्स हे देखील अतिशय अनिवार्य असणारे कागदपत्र आहे. जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स नसताना गाडी चालवली तर मोठ्या प्रमाणात दंड देखील भरावा लागतो.

अनेकजण ड्रायव्हिंग लायसन्सकरिता अर्ज करतात. परंतु त्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांना आपल्या लायसन्सचे डिलिव्हरी मिळते. हीच गोष्ट लक्षात घेऊन, आम्ही तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन पद्धतीने कसे डाउनलोड करायचे याबद्दल माहिती देणार आहोत.

Driving License Download Online

ट्रान्सपोर्ट सर्व्हिस पोर्टलवरून ड्रायव्हिंग लायसन्स असे करा डाउनलोड :

ट्रान्सपोर्ट सर्व्हिस पोर्टलवरून ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला http://sarathi.parivahan.gov.inया परिवहन सर्व्हिस पोर्टलला भेट द्यावी लागेल. वेबसाईटवर येऊन तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सच्या संबंधित दाखवलेल्या सर्व्हिस निवडायचे आहेत.

अधिक वाचा:  Hero Electric Optima CX: स्टाइल, पावर आणि इको-फ्रेंडली राइड तुमच्यासाठी

त्यानंतर “ऑनलाइन सर्व्हिस ” किंवा “ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सर्व्हिस ” ऑप्शनवर क्लिक करावे.

त्यानंतर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स ज्या राज्यातून जारी केले जाते, ते राज्य निवडावे.

त्यानंतर , “प्रिंट ड्रायव्हिंग लायसन्स” वर क्लिक करावे.

आता तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करायची आहे.

त्यानंतर “Submit” बटणावर क्लिक करुन , तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती PDF मध्ये डाउनलोड करून ठेऊ शकता.

डिजीलॉकर द्वारे ड्रायव्हिंग लायसन्स करा डाउनलोड :

सर्वप्रथम DigiLocker च्या वेबसाईटला म्हणजेच digilocker.gov.in भेट द्या. किंवा गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरवरून डिजिलॉकर डाउनलोड करावे  तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स याठिकाणी चेक करून डिजीलॉकर अकाउंटवरुन डाउनलोड करू शकता.

mParivahan अ‍ॅपद्वारे ड्रायव्हिंग लायसन्स करा डाउनलोड :

गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअर वरून तुम्ही mParivahan अ‍ॅप डाउनलोड करू शकता. हे अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर, ते ओपन आणि रजिस्ट्रेशन किंवा लॉगिन करून घ्या. त्यानंतर मोबाईल नंबर किंवा इतर तपशीलांसह रजिस्ट्रेशन करून किंवा अ‍ॅपमध्ये लॉग इन करून घेऊन, या अ‍ॅपद्वारे ड्रायव्हिंग लायसन्स सहजरित्या डाउनलोड करुन घेऊ शकता.

अधिक वाचा:  Holi Car Care Tips: होळीच्या रंगात बसून आपल्या वाहनांचे कसे करावे संरक्षण ?