सलार २ येणार ?

दिग्दर्शक प्रशांत नील यांचा ‘सलार’’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पाहिजे खास प्रगती करू शकला नाही. मात्र प्रभासच्या चाहत्यांची उत्सुकता आणि सिनेमावर दाखवलेल्या प्रेमामुळे , सलार चे निर्माते त्याचा दुसरा भाग आणण्याच्या तयारीत आहेत. ‘सलार’ मध्ये प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन हे प्रमुख भूमिका साकारताना दिसून आले होते. “सलार: भाग १ – युद्धविराम” डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा एक अॅक्शनने भरलेला आणि गँगस्टर ड्रामा असणारा चित्रपट आहे. सलारचा पहिला भाग अपूर्ण राहिला होता, त्यानंतर आता निर्मात्यांकडून सलार २ ची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेता प्रभास यामध्ये देवाची भूमिका साकारताना दिसतो. आणि दुसरा भाग त्याच्या आणि पृथ्वीराज (वरदा) यांच्यातील संघर्षाला पुढे नेणारा आहे.
देवरा २ येणार ?

दिग्दर्शक कोरातला शिव यांचा देवरा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगल्या प्रकारे यशस्वी झालेला दिसून आला. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान हे कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसून आले. “देवरा” चित्रपटाचा पहिला भाग २७ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. यामध्ये एक अॅक्शन ड्रामा दाखवण्यात आला आहे, जो समुद्रकिनाऱ्यावर बेतलेला आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर दुहेरी भूमिका साकारताना दिसून आला. तसेच या चित्रपटात सैफ अली खान खलनायक भैराच्या भूमिकेत होता. कथा तिथून सुरू होते जिथे पहिला भाग संपला होता, दुसरा भाग कथा पुढे नेईल आणि देवरा आणि भैरा यांच्यातील संघर्षावर लक्ष केंद्रित करेल असा आहे.
ब्रह्मास्त्र २ येणार ?

ब्रह्मास्त्र चे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचा ब्रह्मास्त्र सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला चालला. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसून आले. चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेले यश पाहून निर्मात्याने ब्रह्मास्त्र भाग दोन प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय घेतला आहे.”ब्रह्मास्त्र: भाग एक – शिव” २०२२ मध्ये प्रदर्शित झाला. पहिला भाग शिव (रणबीर) आणि ईशा (आलिया) यांच्या प्रेमकथेवर आणि शस्त्रांच्या जगावर केंद्रित होता. दुसरा भाग ब्रह्मास्त्र: भाग दोन – देव असेल, जो शिवाचे वडील देव यांच्या कथेवर केंद्रित असेल.
- Adah Sharma On Marriage: लग्नाबद्दल अदा शर्मा काय म्हणाली
- Chhaava Box Office Collection Day 25 : छावा सिनेमाने पंचविसाव्या दिवशी केली इतकी कमाई