Tata Tiago : टाटा टियागो खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! आता पेट्रोल आणि CNG मॉडेल्सवर मिळणार खास सवलत.
तुम्ही सुद्धा उत्कृष्ट मायलेज आणि चांगली बांधणी असलेली आणि महत्त्वाचे म्हणजे परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असलेली कार घेण्याचा विचार करीत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते.
असे की आपल्याला कल्पना असेलच की, टाटा मोटर्स सिटी यागो ही भारतातील ऑटोमोबाईल बाजार क्षेत्रातील सर्वाधिक मागणी असणाऱ्या अचबॅक पैकी एक आहे. उत्तम मायलेज तसेच उत्कृष्ट बांधणी आणि भारतीय ग्राहकांना परवडेल, अशी किंमत त्यामुळे अनेक ग्राहकांसाठी ही कार अधिक पसंतीची ठरते.
टाटा मोटर्सने मार्च महिन्यात टीयागोच्या MY24 आणि MY25 मॉडेल्सवर खास सवलत जाहीर केली आहे. ही सवलत अशी की ,टाटा टियागोच्या MY24 मॉडेलवर 35,000 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे.
तसेच MY25 मॉडेलवर 25,000 रुपयांपर्यंत बचत करता येईल . परंतु MY25 च्या XE व्हेरिएंटला या सवलती मधून वगळण्यात आले आहे. आणि विशेष म्हणजे, ही सूट पेट्रोल व सीएनजी दोन्ही प्रकारांवर लागू असणार आहे. ही ऑफर ठराविक कालावधीसाठी आणि स्टॉक उपलब्धतेवर अवलंबून असल्यामुळे इच्छुक ग्राहकांनी लगेच या ऑफरचा लाभ घ्यावा.
1.2 लीटर रेवोट्रॉन इंजिन टाटा टियागो मध्ये देण्यात आले आहे. जे 86 पीएस पॉवर आणि 113 NM टॉर्क निर्माण करण्यासाठी मदत करते.
सीएनजी व्हेरिएंटमध्ये हेच इंजिन 73 पीएस पॉवर आणि 95 NM टॉर्क निर्माण करण्यास मदत करते. दोन्ही प्रकारांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचे ऑप्शन आहेत.
सध्याच्या टाटा टियागोमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला गेला असून, यामध्ये 10.25-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्ट देण्यात आलेला आहे. कारमध्ये स्वयंचलित हवामान नियंत्रण, डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि मल्टी-फंक्शन स्टीअरिंग व्हीलसारखी सुविधा सुद्धा आहेत. याशिवाय, एलईडी डीआरएल आणि स्पोर्टी लूकमुळे तिची उपस्थिती अधिक चांगली दिसते.
ड्युअल एअरबॅग्स, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) ईबीडीसह, रिअर पार्किंग सेन्सर्स आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. मजबूत बॉडी स्ट्रक्चरमुळे ही कार उच्च दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यास मदत करते.मार्च महिन्यात उपलब्ध असलेल्या या सवलतीमुळे टाटा टियागो आणखी आकर्षक ठरली आहे.
तर तुम्हाला देखील या ऑफर सोबत कार खरेदी करायची असेल तर, कंपनीची ही ऑफर संपण्यापूर्वी टाटा शोरूममध्ये जाऊन तुमची टियागो बुक करणे आवश्यक ठरेल.