Redmi Turbo 4 pro : Redmi Turbo 4 pro चे स्पेसिफिकेशन आले समोर !

Published on:

Follow Us
 Redmi Turbo 4 pro : Redmi Turbo 4 pro चे स्पेसिफिकेशन आले समोर ! सविस्तर माहिती वाचा इथे.

रेडमीने भारतीय बाजारपेठेत आपले चांगले स्थान मिळवले आहे. त्यामुळे रेडमी ला भारतीय ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे . त्यामुळे कंपनी सुद्धा फोनमध्ये नवनवीन बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्व रेडमीने आपल्या टर्बो सीरिजचा विस्तार करण्याच्या हेतूने Redmi Turbo 4 बाजारामध्ये लाँच करण्यात आला होता.ज्यामध्ये 16GB RAM तसेच 6,550mAh ची बॅटरी सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र आता या सीरिजचा एक प्रो मॉडेल देखील बाजारात घालू पाहत आहे.

या Redmi Turbo 4 Pro चे स्पेसिफिकेशन्स फोन बाजारात लाँच होण्यापूर्वीच लीक झाले आहेत. काय आहेत हे स्पेसिफिकेशन चला तर मग जाणून घेऊयात.

रेडमी टर्बो 4 प्रो मध्ये फ्लॅगशिप दर्जाचे स्पेसिफिकेशन मिळतील. कंपनी यात क्वॉलकॉमचा स्नेपड्रॅगन 8ए एलिट प्रोसेसरचा वापर करेल. तसेच हा रेडमी 5G फोन 7,550एमएएच बॅटरीसह प्रसिद्ध करण्यात येईल. या दमदार बॅटरी सोबतच टर्बो 4 प्रो मध्ये 90वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा:  स्वस्त आणि दमदार Realme Buds T200 Lite तुमच्यासाठी परफेक्ट का आहे

6.8-इंचाच्या मोठ्या स्क्रीनसह हा रेडमी टर्बो 4 प्रो स्मार्टफोन लाँच करण्यात येईल . फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी सुद्धा मिळू शकते.

रेडमी टर्बो 4 प्रो च्या लीकनुसार फोन IP68+IP69 रेटिंगसह सादर केला जाऊ शकतो. म्हणजे हा मोबाइल पाणी आणि धुळीपासून काही प्रमाणात सुरक्षित राहण्यास मदत मिळू शकते. नवीन रेडमी मोबाइल कधी लाँच होईल आणि कंपनी हा भारतात सादर करेल की नाही याबाबत अद्याप कोणतीही पुरेशी माहिती समोर आलेली नाही.

हे आहेत Redmi Turbo 4 चे स्पेसिफिकेशन्स.

रॅम : रेडमी टर्बो 4 5G या फोनमध्ये 16जीबी पर्यंत LPDDR5X RAM आणि 512जीबी पर्यंत UFS 4.0 स्टोरेज मिळते.

बॅटरी : Redmi Turbo 4 मध्ये 6,550एमएएच कार्बन सिलिकॉन बॅटरी मिळते. जी 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते.

अधिक वाचा:  Spilt Screen: स्पिल्ट स्क्रीन मोड नक्की कसा वापरायचा

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स मिळते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 20 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

डिस्प्ले : रेडमी टर्बो4 मध्ये 6.67-इंचाचा 1.5K ओएलईडी डिस्प्ले मिळतो. जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेट, 1920हर्ट्झ पीडब्ल्यूएम डिमिंग आणि 3200निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करती आहे. डिस्प्लेवर Gorilla Glass 7i ची सुरक्षा असेल.

अधिक वाचा:

Realme P3x: 8GB रॅम असणाऱ्या 5G फोनवर मिळतेय भन्नाट ऑफर ! जाणून घ्या इथे