Acidity Problem: तुम्हाला सुद्धा वारंवार होणाऱ्या ऍसिडिटीचा त्रास होतोय ? मग करा हे उपाय…

Published on:

Follow Us

Acidity Problem: बऱ्याचदा ऍसिडिटी सारख्या समस्या या सहसा खाण्याच्या वाईट सवयी, ताणतणाव आणि अनियमित जीवनशैलीमुळे उद्भवत असतात. तुला आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयी सुधारून अ‍ॅसिडिटीची समस्या कमी कशी कमी करता येईल याबद्दल मार्गदर्शन करणार आहोत.

तर मंडळी तुम्हाला देखील वारंवार अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल, आणि त्यातून आराम मिळत नसेल, तर तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये काही बदल करू शकता जेणेकरून तुम्ही, या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

Acidity Problem

खाण्याच्या सवयींमध्ये असे बदल करू शकता :

आपल्या जेवणाचे योग्य असे वेळापत्रक तयार करा.

अधिक वाचा:  Health Care Tips: वजन कमी होण्यासोबतच आणखी बरेच फायदे देणार फक्त या बिया पाण्यात भिजवून खाल्याने!

जास्त तळलेले आणि मसालेदार, पदार्थ आम्लता वाढवू शकतात.त्याऐवजी, हलके, उकडलेले आणि कमी मसालेदार अन्न खा.

दररोज एकाच वेळी जेवण करा.
जास्त वेळ उपाशी राहू नका.
दिवसभरात थोडे थोडे जेवण करा (दर २-३ तासांनी हलके अन्न खा).

जेवल्यानंतर लगेच झोपू नका.

जड आणि तळलेले पदार्थ शक्यतो टाळा.

कॅफिन आणि कोल्ड्रिंक्सचे सेवन टाळा.

चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स आणि सोडा पिण्याचे टाळा.त्याऐवजी, हर्बल टी किंवा कोमट पाणी प्या.

जेवणानंतर किमान ३०-४० मिनिटे सरळ बसा. झोपल्याने पोटातील आम्ल वाढू शकते, ज्यामुळे आम्लता (ऍसिडिटी) वाढते.

फायबरयुक्त आहार घ्या
  • हिरव्या भाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि सॅलड खा.
  • फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो.
  • केळी, काकडी, टरबूज, नारळपाणी आणि पपई यांसारखी फळे आम्लता कमी करण्यास मदत करतात.
  • हे पोटातील आम्ल संतुलित करतात आणि पचन सुधारण्यास मदत होते.
  • पाण्याचे सेवन वाढवा. पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून आम्लता कमी करते.
अधिक वाचा:  Tips to Increase Height: तुमच्या मुलांची सुद्धा वयाप्रमाणे उंची वाढत नाहीये का तर चिंता करू नका कारण

अस्वीकरण: ‘ डेली न्यूज 24’ आरोग्य आणि तंदुरुस्ती श्रेणीमध्ये प्रकाशित होणारे सर्व लेख डॉक्टर, तज्ञ आणि शैक्षणिक संस्थांशी झालेल्या चर्चेच्या आधारे तयार केले जातात.