Chahal Dhanashree Divorce News: युजवेंद्र चहल हा भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आणि त्याची पत्नी म्हणजेच धनश्री वर्मा यांचा २० मार्च रोजी वांद्रे फॅमिली कोर्टात अधिकृत रित्या घटस्फोट झाला आहे.
घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा देताना त्यांच्या वकिलाकडून असे सांगण्यात आले आहे की, “त्या दोघांचा घटस्फोट झाला आहे, तसेच त्यांचे लग्न आता कायदेशीररित्या तुटले आहे.
युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री या दोघांनी घटस्फोटाकरिता प्रथम कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती.परंतु जेव्हा त्यांना कौटुंबिक न्यायालयाने कूलिंग ऑफ पीरियड दिला तेव्हा त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, गुरुवारी वांद्रे कुटुंब न्यायालयात दोघांच्याही घटस्फोटाच्या प्रकरणाची पुन्हा एकदा सुनावणी झाली, आणि दोघांचा घटस्फोट अधिकृत रित्या मंजूर झाला.
युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री यांनी ५ फेब्रुवारी रोजी घटस्फोटाकरिता कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. जिथे त्याला हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३ ब अंतर्गत ६ महिन्यांचा कूलिंग ऑफ कालावधी दिला गेला होता. परंतु दोघांनी सुद्धा कूलिंग ऑफ पिरियड नाकारला आणि पुन्हा उच्च न्यायालयात आपली याचिका दाखल केली. कलम १३ ब नुसार, जेव्हा पती-पत्नी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात, तेव्हा त्यांना न्यायालयाकडून पुन्हा एकदा या विषयावर चर्चा करण्यासाठी वेळ दिला जातो. या काळात, दोघेही घटस्फोट न घेण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु दिलेल्या कालावधीनंतरही, जर दोन्ही पक्षांमध्ये समेट झाला नाही आणि दोघांनाही घटस्फोट घ्यायचा असेल, तर न्यायालय पुढील प्रक्रिया करण्याचे काम करते.
धनश्रीला घटस्फोटानंतर किती पोटगी म्हणून किती पैसे मिळणार ?
युजवेंद्र चहल कडून धनश्रीला पोटगी म्हणून ४.७५ कोटी रुपये देणार असल्याचे सांगितले जात आहे, ज्यापैकी अर्धे पैसे आधीच चहलने धनश्रीला दिले आहेत.