8GB रॅम असणाऱ्या 5G फोनवर मिळतेय भन्नाट ऑफर ! जाणून घ्या इथे
तुम्ही सुद्धा नवीन मोबाईल फोन घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच आनंदाची ठरेल. रियलमी कंपनीने गेल्या महिन्यातच भारतीय बाजार पेठेत आपल्या ‘P’ सिरीजच्या अंतर्गत स्वस्त 5G फोन realme P3x लॉन्च करण्यात आला होता. आणि हा स्मार्टफोन 8GB RAM आणि 6,000mAh Battery च्या रूपात लॉन्च करण्यात आलेला, या मॉडेलची किंमत ₹13,999 पासून सुरू होते. परंतु आनंदाची बातमी अशी आहे की हा बजेट 5G फोन ग्राहकांना आणखी कमी किमतीत खरेदी करता येणार आहे.
रियलमी कंपनीने पी3एक्स 5G फोनवर ₹1,000 डिस्काउंट आणि ₹1,555 प्रति महिना ईएमआय अशी ऑफर उपलब्ध करून दिली आहे. चला तर मग जाणून घेऊयात 5G Phone Offer बद्दल आणखीन सविस्तर माहिती.
रियलमी पी3x 5g हा फोन भारतीय बाजारपेठेत दोन वेगवेगळ्या रॅम आणि व्हेरियंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. रुपये 13,999 ही किंमत 6gb रॅम असणाऱ्या वेरीएंट फोनची आहे. तर 14,999 ही किंमत 8gb रॅम असणाऱ्या वेरीएंटची आहे. परंतु यूपीआय पेमेंट केल्यास कंपनीकडून 1,000 रुपयांचा डिस्काउंट ग्राहकांना मिळणार आहे.त्यामुळे हा फोन कंपनीच्या लाडक्या ग्राहकांना 12,999 आणि 13,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.
कमी EMI वर खरेदी करता येणार .
ज्या ग्राहकांना फोन खरेदी करण्यासाठी ई एम आय चा पर्याय निवडायचा असल्यास अशा ग्राहकांसाठी कंपनीने विशेष ऑफर दिली आहे. ती अशी की, रियलमी p3x 5g हा फोन केवळ 1,555 रुपये प्रति महिना emi वर देखील खरेदी करता येणार आहे. परंतु ही सुविधा Bajaj finance, Idfc bank, TVS credit, home credit, Hdb Financial services द्वारे मिळू शकणार आहे.
हे आहेत realme P3x 5G चे स्पेसिफिकेशन्स.
प्रोसेसर : रियलमी P3x 5G हा MediaTek Dimensity 6400 प्रोसेसर असणारा स्मार्टफोन आहे. हा 6nm आर्किटेक्चरवर आधारित ऑक्टा-कोर प्रोसेसर असून 2.0GHz ते 2.5GHz क्लॉक स्पीडवर कार्य करतो.
कॅमेरा : फोटोग्राफीसाठी realme P3x 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP मुख्य कॅमेरा (f/1.8 अपर्चर) आणि सेकंडरी AI लेंस दिला आहे. LED फ्लॅशसह येणारा हा कॅमेरा उत्तम फोटो क्लिक करता येणार आहे.
मेमरी : हा 5G फोन 6GB RAM आणि 8GB RAM वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यात 10GB एक्सपँडेबल रॅम टेक्नॉलॉजी दिली आहे, त्यामुळे वर्च्युअल RAM च्या मदतीने हा फोन 18GB RAM (8GB+10GB) पर्यंत पॉवरफुल बनतो. यामध्ये 128GB इंटरनल स्टोरेज आणि 2TB पर्यंत मेमरी कार्ड सपोर्ट दिला आहे.
बॅटरी : realme P3x 5G मध्ये 6000mAh बॅटरी आहे. यासोबत 45W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली आहे. त्यामुळे मोठ्या बॅटरीला लवकर चार्ज करता येते. यामध्ये OTG आणि रिव्हर्स चार्जिंग सपोर्टही उपलब्ध आहे.