KL Rahul DC IPL 2025: चॅम्पियनचे हे खेळाडू आयपीएल सामन्यात दिसणार नाहीत. वाचा सविस्तर बातमी इथे

Published on:

Follow Us
KL Rahul DC IPL 2025: चॅम्पियनचे हे खेळाडू आयपीएल सामन्यात दिसणार नाहीत. वाचा सविस्तर बातमी इथे..

चॅम्पियन ट्रॉफी ची चर्चा संपूर्ण भारतभर सुरू असतानाच आता क्रिकेट प्रेमींमध्ये आयपीएल 2025 च्या चर्चां व्हायला सुरुवात झाली आहे. आता भारतात आयपीएलचा थरार लवकरच सुरु होणार आहे. नुकत्याच जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये ज्या ज्या वेळी संघाला धावांची गरज होती, त्या त्यावेळी के एल राहुल एक बाजू चूकपणे सांभाळताना दिसत होता. परंतु आता मात्र आयपीएल २०२५ सुरु होताच हा विकेटकीपर फलंदाज सुरुवातीचे सामने मुकणार असल्याचे चर्चा होताना दिसत आहे.

टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज केएल राहुल आयपीएल २०२५ च्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता सांगितली जात आहे. तरीही फ्रँचायझीने आगामी हंगामा करिता अजून तरी आपला कर्णधार जाहीर केलेला नाहीये.

केएल राहुल २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उत्तम खेळताना दिसला होता. शिवाय तो पूर्णपणे तंदुरुस्त देखील आहे. मग तरीसुद्धा तो सुरुवातीचे सामने का बरं खेळू शकणार नाही ? तर त्याचे कारण असे की, त्याची पत्नी अथिया शेट्टी गर्भवती आहे. आणि ती लवकरच आई होणार असल्यामुळे. अशा परिस्थितीत राहुलला त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. आणि म्हणूनच तो आयपीएल २०२५ चे दोन किंवा तीन सामने गमावू शकतो. अशी शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्सने अद्याप आयपीएल २०२५ साठी आपला नवीन कर्णधार जाहीर केलेला नाही.

अधिक वाचा:  IPL 2025 च्या शानदार उद्घाटन सोहळ्यासाठी तयार आहात का पाहा कुठे आणि कसा पाहता येईल LIVE
या क्रिकेटरने करार रद्द केला .

आयपीएल २०२५ मधून हॅरी ब्रूक याने आपले नाव मागे घेतले असल्याची बातमी समोर आली आहे.
इंग्लंडच्या या फलंदाजाने रविवारी ९ मार्च आपला निर्णय जाहीर केला आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी त्याने स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले. आयपीएल २०२५ ही येत्या २२ मार्चपासून सुरू होणार आहे. १८ व्या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे.