ICC च्या संघात रोहितला डच्चू चाहत्यांचा संताप !

Updated on:

Follow Us

DailyNews24

Stay Updated With the Latest News Anytime, Anywhere!

आम्ही नेहमीच तुमच्यासाठी ताज्या घडामोडी आणि भन्नाट अपडेट्स घेऊन येतो. आज पण आमची टीम अशीच एक जबरदस्त माहिती घेऊन आली आहे. ही बातमी एकदम भन्नाट आहे, त्यामुळे शेवटपर्यंत वाचा आणि कशी वाटली ते नक्की कळवा!

चॅम्पियन्स ट्रॉफीवर टीम इंडियाची मोहर!
बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर केली! जगभरातील टॉप 8 संघ सहभागी झाले होते, पण आपली टीम इंडियाने सगळ्यांना मागे टाकत विजेतेपद पटकावले. आपल्या खेळाडूंनी अफलातून परफॉर्मन्स दाखवत पुन्हा एकदा भारताचे नाव मोठे केले. पण या विजयाच्या आनंदात एक गोष्ट मात्र चाहत्यांना पटली नाही!

ICC च्या संघात रोहित नाही?
आयसीसीने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्वोत्तम 11 खेळाडूंची निवड केली. यात भारताच्या 5 खेळाडूंना स्थान मिळाले, पण रोहित शर्मा मात्र यादीत नाही! ज्या कॅप्टनने टीमला चॅम्पियन बनवलं, त्यालाच डच्चू दिला? हे पाहून चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

हा आहे ICC चा टॉप 11 संघ
ICC ने ज्या खेळाडूंना संघात स्थान दिलंय त्यांची यादी बघा – रचिन रवींद्र, इब्राहिम झद्रान, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ग्लेन फिलिप्स, अझमतुल्ला उमरझाई, मिचेल सँटनर (कर्णधार), मोहम्मद शमी, मॅट हेन्री, वरुण चक्रवर्ती. विशेष म्हणजे यात अफगाणिस्तानच्या दोन खेळाडूंनाही संधी मिळाली आहे.

संघाचा कर्णधार कोण?
यात अजून एक धक्का बसतो तो म्हणजे संघाचा कर्णधार भारतीय खेळाडूला न देता न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरला दिला गेलाय! रोहितचा विचारही झाला नाही, हे पाहून भारतीय क्रिकेट फॅन्स चांगलेच संतापले आहेत.

चाहत्यांची नाराजी आणि ICC वर टीका
सोशल मीडियावर ICC च्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका होतेय. चाहत्यांनी ‘रोहितला संघात स्थान का नाही?’ असा सवाल विचारत ICC वर हल्लाबोल केलाय. भारताने ट्रॉफी जिंकली, पण कर्णधार संघात नाही? असं कुठे असतं का राव? आता पाहायचं की ICC या टीकेला काय उत्तर देणार?

अधिक वाचा:

KL Rahul DC IPL 2025: चॅम्पियनचे हे खेळाडू आयपीएल सामन्यात दिसणार नाहीत. वाचा सविस्तर बातमी इथे

Dailynews24 App Download

Dailynews24 App :

देश, शिक्षण, मनोरंजन, व्यवसाय अपडेट्स, धर्म, क्रिकेट, जन्मकुंडली याबद्दलच्या ताज्या बातम्या वाचा आणि दररोजच्या हिंदी बातम्या आणि व्हिडिओ लघु बातम्या कव्हरेजसाठी येथे डाउनलोड करा.

×
Open App
Responsive Sticky Footer Ad (70px Height)