भारतातील लोकप्रिय असणाऱ्या मोटर सायकल पैकी हिरो स्प्लेंडर प्लस त्यापैकी एक आहे. कंपनीने आता Hero Splendor Plus या बाईकमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक आणि नवीन रंग पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे या गाडीला आता आणखी नवा लुक येणार आहे. 1994 सालापासून भारतीय बाजारात लोकप्रिय असलेल्या या बाईकचा लूक आता अजून स्टायलिश आणि सुरक्षित झालेला आहे. परंतु या अपग्रेडमुळे बाईकच्या किंमती मध्ये देखील थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे.
Hero Splendor Plus हीरो मोटोकॉर्पसाठी विक्रीच्या बाबतीत महत्त्वाची बाईक ठरते. कंपनी द्वारे 1994 साली CD 100 व Sleek या बाईकच्या जागी Splendor लाँच करण्यात आली होती.
त्यावेळी पासून ही बाईक भारतीय ग्राहकांमध्ये अतिशय लोकप्रिय ठरली होती. आज आता मी बाईक भारतातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या बाई पैकी एक आहे. तिचे इंधन कार्यक्षम इंजिन आणि मजबूत बांधणी यामुळे ही बाईक सामान्य लोकांच्या गळ्यातील ताईत बनून आहे.
नव्या 2025 मॉडेलमध्ये सर्वात मोठा बदल
Hero splendor Plus च्या 2025 च्या नव्या मॉडेल मध्ये फ्रंट डिस्क ब्रेक बसवण्यात आला आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या Splendor Plus च्या सर्व व्हेरिएंटमध्ये ड्रम ब्रेक दिलेले आहेत परंतु आता नवीन लॉन्च करण्यात आलेल्या मॉडेलमध्ये ग्राहकांना फ्रंट डिस्क ब्रेक आणि मागील ड्रम ब्रेक पाहायला मिळणार आहे. हा अपडेट सर्व व्हेरिएंटमध्ये असेल की फक्त टॉप व्हेरिएंटसाठी असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
व्हिज्युअल अपडेट्स :
आता नवीन मॉडेल करिता दोन नवीन रंग पर्याय उपलब्ध होणार आहेत. यामुळे बाईकला चांगलाच स्पोर्टी लूक मिळणार आहे. यासोबतच बाईक लॉन्च करता वेळी अजूनही काही नवीन रंग ऑप्शन म्हणून समाविष्ट केली जाऊ शकतात.
Hero Splendor Plus इंधन :
नवीन अपडेट्स त्यानंतर सुद्धा बाईकच्या इंजिनमध्ये कोणताही यांत्रिक बदल करण्यात आलेला नाही. OBD-2B मानकानुसार हे इंजिन अपडेट केले जाईल, मात्र त्याची बेसिक स्पेसिफिकेशन्स त्याच राहतील. कारण या गाडीचे इंधन उत्तम कार्यक्षमतेसाठी ओळखण्यात येणारे आहे
यासोबतच 97.2cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन देण्यात येईल. जे 7.9 bhp ची पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क निर्माण करण्यासाठी मदत करेल. ही बाईक चार-स्पीड गिअरबॉक्स सोबत येते, ज्यामुळे गियर शिफ्टिंग स्मूथ राहते आणि इंधन कार्यक्षमतेत कोणताही परिणाम होत नाही.
किंमत :
सध्या Hero Splendor Plus च्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ही ₹77,176 पासून सुरू होत आहे. परंतु फ्रंट डिस्क ब्रेक आणि नवीन रंग पर्यायांमुळे किंमतीत थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे.