Holi Car Care Tips: होळीच्या रंगात बसून आपल्या वाहनांचे कसे करावे संरक्षण ?

Published on:

Follow Us

DailyNews24

Stay Updated With the Latest News Anytime, Anywhere!

Holi Car Care Tips : होळीच्या रंगांपासून आपल्या वाहनांचे संरक्षण कसे करावे ? आणि कशाप्रकारे योग्य ती काळजी घ्यावी ? याबद्दल आम्ही तुम्हाला या बातमीमधून माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

भारतात सणांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा आणि अनेकांना आवडणारा सण म्हणजे होळी. दरवर्षी होळीचा सण अगदी उत्साहात साजरा करण्यात येतो. एकमेकांना रंग लावीत हा सण अगदी उत्साहाने साजरा केला जातो. या सणानिमित्त बऱ्याच ठिकाणी गर्दीचे प्रमाण वाढते. अशावेळी गाडी पार्किंगच्या सुद्धा समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवणारा दिसतात. आणि अशावेळी रंग खेळताना जर गाडीवर रंग उडालाच तर गाडी खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच होळी खेळताना आपल्या गाडीवर रंग होऊ नये यासाठी कशाप्रकारे संरक्षण करता येईल याबाबत आजच्या या लेखातून आम्ही तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Holi Car Care Tips
Holi Car Care Tips
सुरक्षित ठिकाणी कार पार्क करावी :

जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे कव्हर पार्किंगचे ऑप्शन नसल्यास तुम्ही आपली कार काही वेळासाठी अशा ठिकाणी पार्क करू शकता ज्या ठिकाणी कोणी होळी खेळू शकत नाही. अशा प्रकारची सुरक्षित ठिकाणे आपल्या जवळपास असतातच जे सहसा कोणी येत जात नसते. ज्यामुळे तुमच्या गाडीवर रंग उधळण्याचा प्रश्नच येणार नाही आणि काही नुकसान देखील होणार नाही.

कारला कव्हर झाका :

होळी खेळताना आपल्या गाडीवर रंग उडू नये याकरता, कारला कव्हरने झाकून ठेवणे फायद्याचे ठरते. कवर मुळे कारला रंगांपासून संरक्षण मिळू शकते. बाजारात अनेक प्रकारचे गाड्यांचे कव्हर उपलब्ध आहेत ते तुम्ही उन्हाळ्यात देखील पुन्हा वापरू शकता.

जर तुम्ही एखाद्या सुरक्षित ठिकाणी आपली कार पार्क करीत आहात जेणेकरून तुमच्या गाडीचे काही नुकसान होणार नाही किंवा रंग लागणार नाही, परंतु हे करीत असताना, तुमच्या गाडीचे विंडो ओपन असतील तर ही चूक देखील तुम्हाला बरीच महागात पडू शकते त्यामुळे कारचे विंडो व्यवस्थित बंद करायला विसरू नका .

आता या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला गाडीवर कव्हर टाकणे किंवा कव्हर्ड पार्किंगमध्ये ठेवणे शक्य होत नसेल, तर होळीच्या आधीच तुम्ही तुमच्या गाडीच्या कलरवर चांगल्या क्वालिटीचे वॅक्स लावून घेऊ शकता. किंवा चांगल्या ठिकाणाहून कोटिंग सुद्धा करता येते. यामुळे गाडीचा कलर देखील निघणार नाही आणि काही नुकसान सुद्धा होणार नाही.

Dailynews24 App Download

Dailynews24 App :

देश, शिक्षण, मनोरंजन, व्यवसाय अपडेट्स, धर्म, क्रिकेट, जन्मकुंडली याबद्दलच्या ताज्या बातम्या वाचा आणि दररोजच्या हिंदी बातम्या आणि व्हिडिओ लघु बातम्या कव्हरेजसाठी येथे डाउनलोड करा.

Open App
Responsive Sticky Footer Ad (70px Height)