Mahindra Scorpio N बजेटमध्ये चांगली SUV खरेदी करायची आहे ? तर ही गाडी नक्कीच उत्तम पर्याय ठरेल

Published on:

Follow Us

महिंद्रा स्कॉर्पिओ ही भारतातील लोकप्रिय गाड्यांपैकी एक मानले जाते. या गाडीच्या उत्तम परफॉर्मन्स तसेच मस्क्युलर लुक आणि प्रीमियम वैशिष्ट्यांमुळे ती अनेकांच्या पसंतीस उतरते. आणि टॉप-एंड व्हेरिएंट करिता जास्त किंमत मोजावी लागते. त्यामुळे बजेटमध्ये SUV खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांसाठी महिंद्राने कमी किमतीत सुद्धा काही मॉडेल्स लॉन्च केले आहेत.

स्वस्त मॉडेल आणि किंमत :

ज्या ग्राहकांचे बजेट 15 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी स्कॉर्पिओ एन चे बेस मॉडेल Z2 उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.99 लाख रुपये आहे.

डिझाइन :

बेस मॉडेल असून देखील, स्कॉर्पिओ एन Z2 ला महिंद्राने आकर्षक आणि दमदार लुक दिला आहे. यात एलईडी हेडलॅम्प आणि डेटाइम रनिंग लाइट्स (DRL), 17-इंच स्टील चाके, काळ्या रंगातील पुढील आणि मागील बंपर, आणि मागील स्पॉयलर दिला आहे. या फीचर्समुळे गाडी रस्त्यावर चालताना अतिशय स्टायलिश दिसते.

अधिक वाचा:  MG Cars Offer मार्च महिन्यात कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर या गाड्यांवर मिळणार धमाकेदार ऑफर
इंजिन :

महिंद्रा स्कॉर्पिओ एन Z2 मध्ये 2.0 लीटर mHawk टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5000 RPM वर 149.14 kW पॉवर आणि 1750-3000 RPM वर 370 Nm टॉर्क निर्माण करते. तसेच 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह हे इंजिन येते.

सुरक्षा आणि ड्रायव्हिंग सेफ्टी फीचर्स

महिंद्रा स्कॉर्पिओ एन Z2 या गाडी मध्ये प्रवाशांच्या सुरक्षेकरिता काही महत्त्वपूर्ण फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये 2 एअरबॅग्ज, EBD इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन सह ABS, तसेच मागील पार्किंग सेन्सर यांचा समावेश करण्यात आला आहे. या फीचर्स मुळे गाडीला सुरक्षितता मिळते.

स्कॉर्पिओ एन Z2 उत्तम पर्याय

तुम्ही सुद्धा कमीत कमी किंमतीत मोठी SUV शोधत असाल, तर स्कॉर्पिओ एन Z2 हा नक्कीच तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. कमी किमतीत दमदार इंजिन आणि मजबूत डिझाइन सह अधिक सुरक्षा फीचर्स देण्यात येतात. त्यामुळे हे मॉडेल बजेटमध्ये SUV घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.

अधिक वाचा:  Maruti XL6 दमदार परफॉर्मन्स आणि स्टायलिश लुक्स