होळीच्या आधीच सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 14 मार्च 2025 पासून सर्वत्र होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असणार आहे. अशातच सर्वसामान्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे ती म्हणजे, महाराष्ट्र राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये काही प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना मध्ये कुठेतरी एक दिलासा देणारा भाषेचा किरण निर्माण होणार आहे. तसे पाहायला गेले तर काही प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झालेली आहे परंतु देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्य विधाने म्हणजेच मुंबईमध्ये पेट्रोलच्या किमतीत घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार देशाची राष्ट्रीय राजधानी असलेल्या दिल्ली पासून ते चेन्नई पर्यंत सर्वच शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमतीत चार पैसे ते एक रुपया प्रति लिटर पर्यंत दरवाढ झालेली दिसून आली आहे. दरम्यान यातील अधिक वाढतील कोलकत्ता शहरामध्ये झालेली दिसून आली. त्याचप्रमाणे दुसरीकडे देशाच्या आर्थिक राजधानी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घसरण झाल्याचे दिसले. मुंबई शहरात आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत थोड्या प्रमाणात घसरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
मुंबईत इतका कमी झाला भाव :
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात आज पेट्रोलच्या किमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता होळीनिमित्त मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असे म्हणता येईल. तसेच, IOCL च्या आकड्यांनुसार, 13 मार्च 2025 रोजी म्हणजेच आज मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत 44 पैसे प्रति लिटरची कपात दिसून आली आहे , या कपातीनंतर आज मुंबई शहरात पेट्रोलची किंमत 103.50 रुपये प्रति लिटर झाल्याचे पाहायला मिळाले.
आज मुंबईत डिझेलच्या किंमतीत सर्वाधिक 2.12 रुपये इतकी कपात झालेली आहे. या कपाती नंतर आज राजधानीत डिझेलची किंमत 90.03 रुपये प्रति लिटर झाली, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली आणि चेन्नई या महानगरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 5 पैशांची वाढ झालेली दिसून आली आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव आता 94.77 रुपए प्रति लिटर तर डिझेल 87.67 रुपये प्रति लिटरवर येऊन पोहोचला आहे.