काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अजूनही चांगलाच तग धरून ठेवला आहे. मुख्य भूमिकेत असणाऱ्या विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘छावा’ चित्रपटाने अवघ्या दिवसांत बक्कळ कमाई केली आहे. ‘छावा’ सिनेमाने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. परंतु चौथा आठवडा संपताच चित्रपटाच्या कमाई मध्ये जरा पडडझड दिसून आली आहे. मात्र असे असले तरी देखील छावा सिनेमाने अनेक दिग्गजांना मागे सोडले.
दरम्यान, ‘छावा’ चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित आहे. या चित्रपटात शंभू राजांची भूमिका विक्की कौशलनं साकारली आहे. तर, अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय रश्मिका मंदाना, आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंह हेदेखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.
छावा चित्रपटानं तेलुगू आणि हिंदीमध्ये एकत्रितपणे 23 व्या दिवशी म्हणजेच शनिवारी, 17.01 कोटी रुपये कमावले, परंतु रविवारी, 24 व्या दिवशी, IND विरुद्ध NZ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामुळे चित्रपटाच्या कमाईत चांगलीच घट झाल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे काहीप्रमाणात का होईना, छावा सिनेमाला फटका बसल्याचं पाहायला मिळालं. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावेळी म्हणजेच 9 मार्च रोजी चित्रपटानं एकूण फक्त 10.65 कोटी रुपयांची कमाई केली होती. आणि आता छावा सिनेमाने चित्रपट गृहात आपले 25 दिवस पूर्ण केलेले आहेत. याचदरम्यान आता चित्रपटाच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे देखील काही आकडे समोर आल्याचे दिसत आहे.
25 व्या दिवशी छावा सिनेमाने फक्त 10.65 कोटी रुपये कमावले. आज चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाचा 25 वा दिवस आहे आणि चित्रपटाच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात यासंदर्भात अधिक माहिती.
छावा’चं सुरुवातीपासूनचे बॉक्स ऑफिस कलेक्शन.
‘छावा’ सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात 225.8 कोटी रुपयांचा गल्ला केला होता. तसेच दुसऱ्या आठवड्यात 186.18 कोटी रुपये आणि तिसऱ्या आठवड्यात 84.94 कोटी , चौथ्या आठवड्यात एकूण 36.59 कोटी रुपये कमावले, ज्यामध्ये हिंदीतून 28.43 कोटी रुपये व तेलुगूतून 8.16 कोटी रुपये इतकी कमाई केली . म्हणजेच 24 दिवसांत चित्रपटाचं एकूण कलेक्शन 533.51 कोटी रुपयांवर पोहोचलं. परंतु आता 25 व्या दिवशी चित्रपटाच्या आठवड्याच्या दिवसांमध्ये घट होताना दिसून येत आहे. चित्रपटाचं आजचं कलेक्शन पुन्हा एकदा सिंगल डिजीटमध्ये पोहोचलं आहे.
पठाण आणि ॲनिमल सिनेमाचे रेकॉर्ड्स मोडणार ‘छावा’?
2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ आणि ‘अॅनिमल’ यांनी अनुक्रमे 543.09 कोटी आणि 553.87 कोटी रुपयांची कमाई केली होती. छावाची कमाई आता निश्चितच कमी झाली आहे, परंतु सध्या दुसरा कोणताही मोठा चित्रपट बॉक्स ऑफिसवर छावाशी स्पर्धा करणार नाही. अशा परिस्थितीत, छावा पठाण आणि अॅनिमलचे रेकॉर्ड सहज मोडेल अशी शक्यता दिसत आहे.