Mumbai Metro: घाटकोपर ते अंधेरी थेट मेट्रो सेवा होणार सुरू !

Published on:

Follow Us
Mumbai metro : घाटकोपर ते अंधेरी थेट मेट्रो सेवा होणार सुरू !

घाटकोपर ते अंधेरी थेट मेट्रो सेवा होणार सुरू !

मेट्रो ने प्रवास करणाऱ्या मुंबई करांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. २०२५ मार्च च्या अखेरपासून घाटकोपर ते अंधेरी थेट मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच MMOPL द्वारे कामाला जायच्या वेळेस होणारी प्रवाशांची गर्दी नियंत्रणामध्ये आणण्यासाठी हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ही सेवा सुरू करण्यात येण्याच्या सर्व चाचण्या सुरू झाल्या आहेत. आहे या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर थेट मेट्रो मार्गिका प्रत्यक्षात धावली जाणार आहे. त्यामुळे एक प्रकारे प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.

प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा 

२०१४ पासून वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ मार्गिका कार्यान्वित करण्यात आलेली आहे. परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे सध्या या मार्गिकेवर दररोज ४.८ लाख प्रवासी प्रवास करत आहेत . आणि त्यामधील तब्बल ८८% प्रवासी घाटकोपर ते अंधेरीदरम्यानच प्रवास करत असल्याचे समोर आले. सकाळ-सायंकाळच्या गर्दीच्या वेळी घाटकोपर ते अंधेरी हा प्रवास अधिक कोंदट होतो.

अधिक वाचा:  Pune Bus Service: पुणे बस प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी

तर अंधेरी ते वर्सोवा हा मार्ग तुलनेने मोकळाच राहतो. त्यामुळे घाटकोपर-अंधेरी थेट मेट्रो सेवा सुरू केल्यामुळे प्रवाशांना एक प्रकारे मोठा दिलासा मिळणार आहे. मेट्रोच्या या नवीन आणि थेट सेवेमुळे आता मेट्रो फेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार असून प्रवाशांसाठी प्रतीक्षेचा कालावधी कमी होईल. दोन मेट्रो गाड्यांमधील अंतरही कमी होऊन गर्दी नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे.