Pune Bus Service: पुणे बस प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी

Published on:

Follow Us

मुंबईतील लोकल ट्रेन ज्याप्रमाणे मुंबईकरांच्या लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जातात त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पीएमपीएलच्या बसेस तेथील नागरिकांसाठी लाईफ लाईनचे काम करतात. या बसेसमुळे पुणेकरांच्या प्रवास चांगला आणि वेगवान होण्यास मदत होते आहे. आता अशातच पुण्यातील नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.आता पीएमपीएलच्या माध्यमातून एका नव्या मार्गावर बस सेवा सुरू करण्यात येत आहे. तर आजच्या या बातमीतून आपण याचबद्दल सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पिंपरी चिंचवड शहराचा मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात विकास उताना दिसून येत आहे. दरम्यान रावेत भाग देखील चांगल्या प्रकारे विकासाच्या मार्गावर असल्याचे दिसते आहे. नियमित कामाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील रावेत मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता पी.एम.पी.एल. प्रशासनाकडून दोन नवीन बस सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. याच्या जवळच आयटी नगरी हिंजवडी सुद्धा आहे. त्यामुळे आता झपाट्याने विकसित होणार्‍या या परिसरात गृह खरेदीकरिता आयटीयन्‍स देखील पसंती देताना दिसत आहेत.

परंतु विकास होत असणाऱ्या रावेत परिसरातुन हिंजवडी आणि तळवडे भागात कामासाठी जाणाऱ्यांची संख्या अधिक असली तरीही हिंजवडी आणि तळवडे भागाकरिता रावेत मधून एक सुद्धा पी.एम.पी.एल ची बस सेवा सुरू नव्हती. त्यामुळे आता या मार्गावर बस सुरू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत होती.

अधिक वाचा:  Sunita Williams: अखेर 9 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ,सुनीता विल्यम्स आपल्या बूच सह पृथ्वीवर परतल्या

त्यामुळे आता ही मागणी पूर्ण केली असून, रावेत मधून हिंजवडी आणि पिंपरी साठी नवीन बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे रावेत परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी ही दिलासा देणारी बाब ठरत आहे. माझ्यासोबत आज लवकर दार वर्गासाठी सुद्धा हा फायद्याचा निर्णय आहे. या निर्णयामुळे नागरिकांना प्रवासासाठी जे जास्तीचे पैसे आणि वेळ मोजावा लागत होता तो आता कमी होणार आहे.

रावेतहून पिंपरीला येण्‍यासाठी 13 क्रमांकाची बस सुरू करण्‍याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता नक्कीच पीएमपीएल प्रशासनाने घेतलेला निर्णय रावेत परिसरातील नागरिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे.