बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटीतून रोहितला वगळण्यात आले होते, ज्यामुळे या फॉरमॅटमध्ये त्याच्या भविष्याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली. तथापि, रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने नुकतेच न्यूझीलंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या विजेतेपदानंतर, रोहित शर्मा इंग्लंड दौऱ्यावर कसोटी कर्णधार राहणार का? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र अलीकडेच, मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले होते, की रोहित जूनमध्ये इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत कर्णधारपद भूषवू शकतो येत सांगण्यात आले होते, परंतु आता अशी सुद्धा माहिती समोर आली आहे की निवडकर्त्यांनी अद्याप तरी या दौऱ्यासाठी कोणताही निर्णय घेतलेला नाही.
रोहितच्या नेतृत्वाखाली जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी :
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी रोहित वाईट काळातून जात होता. आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याची कामगिरी देखील पाहिजे तेवढी चांगली दिसत नव्हती. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटीतून रोहितला वगळण्यात आले होते.
तथापि, रोहितच्या नेतृत्वाखाली, भारताने अलीकडेच न्यूझीलंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, जी गेल्या नऊ महिन्यांतील त्यांचे दुसरे आयसीसी विजेतेपद आहे. यापूर्वी, संघाने रोहितच्याच नेतृत्वाखाली २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकली होती.
ऑस्ट्रेलिया कसोटीनंतर भारताने एकही कसोटी खेळलेली नाहीये, त्यामुळे कसोटी कर्णधारपदात अद्याप कोणताही बदल झाला नाही. तसेच, रोहितने सुद्धा असे म्हटले नाहीये, की त्याला कसोटी खेळायची नाही.
इंग्लंड दौऱ्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सुत्रांकडून देखील असे सांगण्यात आले आहे की , राष्ट्रीय निवड समितीने इंग्लंड मालिकेबाबत अद्याप निर्णय घेतला नाही.
Lucknow Super Giants IPL 2025: आयपीएल सुरू होण्यापूर्वीच लखनऊचे नुकसान
ICC च्या संघात रोहितला डच्चू चाहत्यांचा संताप !
KL Rahul DC IPL 2025: चॅम्पियनचे हे खेळाडू आयपीएल सामन्यात दिसणार नाहीत. वाचा सविस्तर बातमी इथे