NZ vs PAK: न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पहिल्याच सामन्यात पाकिस्तानची खराब हालत !

Published on:

Follow Us

पाकिस्तानने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्याच सामन्यात म्हणजेच T20 सामन्यात अतिशय वाईट सुरुवात केली आहे. रिझवान आणि बाबर आजम सोडल्यास इतर पाकिस्तानी टीमची व्यथा खूप खराब झाली. पाकिस्तान आणि न्यूझीलंड मध्ये एकूण पाच सामन्यांची टी20 सीरीज सुरु झाली.

पाकिस्तानी टीमला लाजिरवाण्या पराभवाला सामोर जावं लागलं आहे. मात्र न्यूझीलंडच्या टीमने धमाकेदार विजयासोबत आपली चांगली सुरुवात केली आहे.

दोन्ही टीम्स पाच T20 सामन्यांची मालिका खेळणार आहेत. पहिला सामना ख्राइस्टचर्चच्या हेगले ओव्हल मैदानात पार पडला आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तानचा ना कुठला फलंदाज चालला, ना गोलंदाज. पाकिस्तानी टीममध्ये कोणालाही हवी तशी छाप उमटवणारी कामगिरी करता आली नसल्याचे दिसून आले.

अधिक वाचा:  IPL 2025 च्या शानदार उद्घाटन सोहळ्यासाठी तयार आहात का पाहा कुठे आणि कसा पाहता येईल LIVE
पोकळ फलंदाजी :

न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या T20 सामन्यात पाकिस्तान टीमची टॉप ऑर्डर पोकळ असल्याचे दिसून आले. पावरप्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये सर्वात जास्त धावा निघतात. तिथे पाकिस्तानी फलंदाज 28 निर्धाव चेंडू खेळले आहे.

जोरदार गोलंदाजी :

न्यूझीलंडकडून जेकब डफीनला सर्वात जास्त 4 विकेट काढता आल्या. दरम्यान काइल जेमीसनने सुधा त्याला चांगल्या प्रकारे साथ दिली. त्याने 4 ओव्हरमध्ये 8 रन्स देऊन 3 विकेट काढल्या.

पाकिस्तानला काढता आल्या फक्त विकेट :

पाकिस्तान सुरुवातीपासूनच जेमतेम खेळत होतं परंतु दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड टीमला मात्र विजयाकरिता फक्त 92 धावांच टार्गेट मिळालं. आणि त्यांनी सुद्धा फक्त 10.1 ओव्हरमध्येच 61 चेंडूत टार्गेट गाठलं देखील.

तसे पाहायला गेले तर न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा टिम सेफर्टने बनवल्या होत्या. त्याने 29 चेंडू मध्ये 151.72 च्या स्ट्राइक रेटने 44 धावा काढल्या. यामध्ये 7 चौकार आणि 1 षटकार होता. फिन एलन 17 चेंडूत 29 धावा काढून नाबाद राहिला. टिम रॉबिन्सनने 15 चेंडूत नाबाद 18 धावा केल्या. आणि पाकिस्तान टीमला फक्त एक विकेट मिळाला.

अधिक वाचा:  ICC च्या संघात रोहितला डच्चू चाहत्यांचा संताप !