आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी नंतर आता भारतात पुन्हा एकदा क्रिकेट प्रेमींमध्ये आयपीएलचची उत्सुकता वाढली आहे.यंदा आयपीएल सामन्याचा १८ वा हंगाम हा २२ मार्च २०२५ पासून सुरू होतो आहे. तसेच सर्व आयपीएल संघांमध्ये जोरदार तयारी सुरू झालेली आहे. मेगा लिलाव देखील या आयपीएल हंगामापूर्वी पार पाडण्यात आता आहे, ज्यामध्ये संघाना आपला नवीन कर्णधार मिळाला आहे. लखनौ सुपर जायट्संने या मेगा हंगामा मध्ये सर्वात महागडा खेळाडू विकत घेतला आहे. ऋषभ पंतवर संघ मालक संजय गोएंकाद्वारे २७ लाख रुपयांची बोली लावण्यात आली. आणि ऋषभलाच या संघाचा कर्णधार देखील करण्यात आला आहे.
दरम्यान लखनऊ सुपर जायंट्सला यावेळी चांगलाच धक्का बसला आहे. कारण, मयंक यादव म्हणजेच संघाचा युवा गोलंदाज दुखापतीतून अजूनही बऱ्यापैकी सावरला नाहीये, तो आयपीएल २०२५ च्या पहिल्या सहामाहीतून बाहेर पडेल असे मानले जात आहे. तो यंदा आयपीएलच्या दुसऱ्या सत्रापासून खेळू शकतो. मयंक यादवने त्याच्या वेगाने सर्वांना प्रभावित केले आहे, तो मोठमोठ्या फलंदाजांना तोड देताना दिसून आला होता. यामुळेच लखनौ सुपर जायंट्सने त्याला लिलावापूर्वी ११ कोटी रुपयांना कायम ठेवले.
मयंक यादवने आयपीएल २०२४ मध्ये देखील ४ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ७ विकेट्स घेतल्या होत्या. त्याची इकॉनॉमी सुमारे ७ (६.९९) होती. गेल्या वर्षी तो त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे चर्चेत राहिला. त्याने आरसीबीविरुद्ध आयपीएल २०२४ मधील सर्वात वेगवान चेंडू (१५६.७) टाकला. लखनौ सुपर जायंट्स दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळून आयपीएल २०२५ च्या प्रवासाची सुरुवात करेल, त्यांचा पहिला सामना २४ मार्च रोजी खेळला जाईल. आयपीएल २०२५ साठी, फ्रँचायझीने ऋषभ पंतची कर्णधार म्हणून निवड केली आहे. ज्याला संघाने लिलावात २७ कोटी रुपयांना खरेदी केले होते.
मयंक यादवला झालेली दुखापत
मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण झाल्यानंतर मयंक यादवला पाठीच्या कण्याला दुखापत झालेली, ज्यातून तो अजूनही सावरत आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे त्याने अलिकडेच बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुन्हा नव्याने आपली गोलंदाजी सुरू केल्याचे पाहायला मिळाले. परंतु ईएसपीएनच्या अहवालानुसार, बीसीसीआयने मयंक यादवच्या पुनरागमनाची कोणतीही तारीख निश्चित केलेली नाहीये. जर मयंकने तंदुरुस्तीचे निकष पूर्ण केले आणि त्याचा कामाचा ताण वाढवला, तर तो आयपीएल २०२५ च्या दुसऱ्या भागात खेळताना दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- ICC च्या संघात रोहितला डच्चू चाहत्यांचा संताप !
- KL Rahul DC IPL 2025: चॅम्पियनचे हे खेळाडू आयपीएल सामन्यात दिसणार नाहीत. वाचा सविस्तर बातमी इथे