CLOSE AD

Summer Face Oil: उन्हाळ्यात या तेलांचा वापर करून, ग्लोइंग त्वचेसाठी होणार मदत !

Published on:

Follow Us

उन्हाळ्यात तुमच्या त्वचेला आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात पाण्याचे सेवन करणे कधीही चांगलेच आहे. यासोबतच आपल्या आहारामध्ये फळांच्या रसाचा समावेश केल्याने आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. फळांचा रस, भाज्यांच्या रस आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटिन, फायबर तसेच अँटिऑक्सिडेंट्स पुरवायला मदत करतात. ज्यामुळे आरोग्याला चांगले फायदे होतात.

उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच, तुम्ही आपल्या त्वचेची काळजी घेण्याच्या दिनचर्येत बदल करायला हवा , जेणेकरून या ऋतूतही तुमची त्वचा मऊ राहण्यास मदत होईल. चेहऱ्यावरील पिगमेंटेशन आणि टॅनिंग टाळण्याकरिता, निरोगी आहारासोबतच त्वचेची योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते.

सनस्क्रिन : उन्हाळ्यात आपण जेव्हा घराबाहेर पडतो त्यावेळी येणारा सूर्यप्रकाश थेट आपल्या चेहऱ्याच्या संपर्काते येतो, आणि त्यामुळे आपल्या त्वचेला नुकसान होण्याची शक्यता असते. अशावेळी सूर्यप्रकाश थेट आपल्या चेहऱ्यावर पडल्यामुळे बऱ्याचदा टॅनिंग सारख्या समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत त्वचेची टॅनिंग कमी करण्यासाठी तुम्ही दर 2 ते 3 तासानी चेहऱ्यावर एसपीएफ 30 किंवा त्याहून अधिक पावर असलेल्या सनस्क्रिनचा वापर केला जाऊ शकतो. योग्य सनस्क्रिनचा वापर केल्यामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होण्यास मदत होते. सनस्क्रिनमुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण केले जाते.

खोबरेल तेल : खोबरेल तेलाचा तुमच्या चेहऱ्यावर वापर केल्यामुळे तुमच्या चेहऱ्याला नैसर्गिकरित्या हायड्रेट करण्यास मदत मिळते. उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा सतत धुतल्यामुळे चेहरा कोरडा आणि ड्राय होण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर खोबरेल तेलाचा मसाज केल्यामुळे त्वचा चमकदार आणि मॉईश्चरायझ होण्यास मदत होते. आणि खोबरेल तेलाचा वापर चेहरा चमकदार राहण्यास मदत करतो.

कोरफडीचे जेल : उन्हाळ्याच्या दिवसात, कोरफडीचे जेल त्वचेला थंडावा आणि ओलावा प्रदान करते. जर तुमच्या त्वचेवर उन्हाची जळजळ होत असेल किंवा जळजळ होत असेल तर अ‍ॅलोवेरा जेल लावा. हे त्वचेला ताजेपणा आणि चमक देण्यास देखील मदत करते. तुम्ही ते ताज्या कोरफडीच्या पानांपासून काढून थेट वापरू शकता.

Dailynews24 App :

देश, शिक्षण, मनोरंजन, व्यवसाय अपडेट्स, धर्म, क्रिकेट, जन्मकुंडली याबद्दलच्या ताज्या बातम्या वाचा आणि दररोजच्या हिंदी बातम्या आणि व्हिडिओ लघु बातम्या कव्हरेजसाठी येथे डाउनलोड करा.

googleplayiosstore