Sunita Williams: अखेर 9 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ,सुनीता विल्यम्स आपल्या बूच सह पृथ्वीवर परतल्या

Published on:

Follow Us

Sunita Williams

Sunita Williams: सुनिता विल्यम्स अंतराळात सर्वात जास्त काळ घालवणारी महिला ठरली आहे. नुकतेच ड्रॅगन स्पेसक्राफ्टच्या यशस्वी लँडिंगनंतर सुनीता विलियम्ससह सर्व अंतराळवीरांना बाहेर काढण्यात आलं आहे. दरम्यान घरी परतण्याचा आनंद सुनीता विल्यम्स यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आला. तब्बल नऊ महिन्यांनी सुनीता विलियम्स पृथ्वीवर परत आल्या आहेत. तसेच 9 महिन्यांची दीर्घ प्रतीक्षेनंतर सुनीता विलियम्स निक हेग, बुच विल्मोर आणि अलेक्जेंडर गोर्बुनोव यांच्यासोबत त्या पृथ्वीवर सुरक्षित परतल्या .

 

सुनीता विल्यम्स आणि बुच त्यांचे मागील वर्षी म्हणजेच ५ जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचले होते. त्यांचा हा प्रवास फक्त ८ दिवसांचा ठरला होता, परंतु तांत्रिक अडचणी मुळे त्यांना तब्बल ९ महिने तिथेच रहावे लागले.

अधिक वाचा:  Maharashtra Petrol Diesel Price: होळीच्या आधीच सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी आली समोर

६२ तास ९ वेळा केला स्पेसवॉक :

नासाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमने ९०० तासांचे संशोधन पूर्ण केले. तसेच १५० हून अधिक प्रयोग केले आणि एक अंतराळात सर्वात जास्त वेळ घालवणारी महिला म्हणून तिने नवा रेकॉर्ड तयार केला आहे. यासोबतच तिने अंतराळ स्थानकाच्या बाहेर ६२ तास ९ मिनिटे घालवली. म्हणजेच ९ वेळा स्पेसवॉक केला आहे.

स्पेशलडाऊन म्हणजे नक्की काय असते ?

अवकाश यान लँडिंगला स्पेशल डाऊन  म्हंटले जाते. स्पेसएक्सच कॅप्सूल सोमवार-मंगळवार दरम्यान रात्री एक वाजण्याच्या सुमारास आंतरराष्ट्रीय अवकाश तळावरुन निघालं होतं. हवामान अनुकूल असल्याने अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर फ्लोरिडा येथे ५ वाजून ५७ मिनिटांनी आणि भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री ३ वाजून २७ मिनिटांनी स्पॅलशडाऊन करण्यात आले आहे.

अधिक वाचा:  Mumbai Metro: घाटकोपर ते अंधेरी थेट मेट्रो सेवा होणार सुरू !