द केरळ स्टोरी या चित्रपटामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री अदा शर्मा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते आणि त्यामुळे मी बऱ्याचदा चर्चेचा विषय देखील ठरते. काही दिवसांपूर्वीच अदा शर्मा ने सुशांत सिंह राजपूतच्या ज्या घरात व्यक्ती झाला होता ते घर विकत घेतलं होतं तो विषय देखील सोशल मीडियावर बराच चर्चेचा ठरत होता. त्यानंतर पुन्हा एकदा आता तिला घेऊन सोशल मीडियावर एक नवीन विषय वायरल होताना दिसतोय तो म्हणजे तिने केलेले आपल्या लग्नाविषयीचे भाष्य. तिने दिलेल्या एका मुलाखतीत तिला लग्न संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर तिने असे काही उत्तर दिले की ज्यामुळे तो सोशल मीडियावर आता चर्चेचा विषय ठरत आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.
मुलाखती दरम्यान विचारलेल्या या प्रश्नावर उत्तर देताना अदा शर्मा आणि असे वक्तव्य केले आहे की , “माझं लग्नच होऊ नये, असं माझं स्वप्न आहे. लग्न होण्याचं स्वप्न पाहणं म्हणजे माझ्यासाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखं आहे. मला कोणत्याही नात्याची भीती वाटत नाही. मी ऑनस्क्रीन बऱ्याचदा नवरीची,बायकोची भूमिका साकारली आहे. परंतु अशा भूमिका साकारल्यामुळे खऱ्या आयुष्यातली लग्नाविषयीची माझी आवडच निघून गेलेली आहे. आता माझी लग्न करण्याची इच्छाच होत नाही. पण भविष्यात माझा लग्नाबाबतचा विचार बदलला तर मी एकदम कम्फर्टेबल कपड्यांमध्ये लग्न करेन. भरजरी लेहंगा घालून मला लग्न करायचं नाहीये. अस ती म्हणाली आहे.
अदा शर्माच्या कामाबद्दल
अदा शर्मा अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक हिंदी चित्रपटांबरोबरच तेलुगू चित्रपटांमध्ये देखील बरंच काम केलं आहे. तिने 2008 मध्ये आलेल्या ‘1920’ या हॉरर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले त्यानंतर तिने आपल्या अभिनय शैलीच्या बळावर अनेक एका पाठोपाठ एक चांगले सिनेमे केले. ‘हसी तो फंसी’, ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात ती महत्त्वाची भूमिका साकारताना दिसुन आली. तिने ‘क्षणम’, ‘S/O सत्यमूर्ती’, ‘हार्ट अटॅक’ अशा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.