Spilt Screen: स्पिल्ट स्क्रीन मोड नक्की कसा वापरायचा

Published on:

Follow Us

Spilt Screen: आजच्या लेखात आपण एकाच वेळेला दोन ॲपचा कसा वापर केला जाऊ शकतो याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. याबद्दल तुम्हाला आधीच माहिती आहे का नसल्यास काळजी करण्याची गरज नाही कारण ,आज आम्ही तुम्हाला याचविषयीची माहिती सांगणार आहोत. आणि विशेष म्हणजे ही गोष्ट अतिशय सहजपणे करता येणारी आहे. जाणून घेऊयात.

 

असे करा स्प्लिट स्क्रीन अ‍ॅक्टिव्ह :
  • सर्वप्रथम तुम्हाला वापरायचे असलेले अ‍ॅप ओपन करून घ्यावे.
  • आता स्क्रीनच्या खालून स्वाईप करा आणि धरून ठेवा किंवा स्क्वेअर रिसेंट अ‍ॅप्स बटणावर टॅप करा. हे तुम्हाला नेव्हिगेशनवर अवलंबून असते.
  • अलीकडील अ‍ॅप्स पहिले अ‍ॅप शोधा.
  • अ‍ॅप ओवरव्यूवरील अ‍ॅप आयकॉनवर टॅप करा.
  • स्प्लिट स्क्रीन पर्याय निवडा त्यानंतर,
  • पहिला अ‍ॅप तुम्हाला स्क्रीनच्या वरच्या भागात दिसेल.
  • अलीकडील अ‍ॅप्स ओवरव्यूमधून तुम्हाला वापरायचे असलेले दुसरे आप निवडा.
  • दुसरा अ‍ॅप स्क्रीनच्या खालील भागात दर्शवला जाईल.
अधिक वाचा:  विवो ने लॉन्च केलाय 6500mAh बॅटरीसह आपला धमाकेदार स्मार्टफोन! काय असणार किंमत जाणून घ्या

अ‍ॅप ड्रॉवर वापरणे :

  1. सर्वप्रथम आपल्या डिवाइस मध्ये ॲप ओपन करा. तुम्हाला
  2. स्क्रीनच्या खालून स्वाइप करून आणि धरून ठेवून किंवा स्क्वेअर रिसेंट अ‍ॅप्स बटणावर टॅप करायचे आहे.
  3. आता तुम्ही स्प्लिट स्क्रीनमध्ये तुम्ही वापरू इच्छित असलेले अ‍ॅप शोधा.
  4. अ‍ॅप आयकॉनवर टॅप करा आणि धरून ठेवा.
  5. उपलब्ध असल्यास स्प्लिट स्क्रीन निवडा.
  6. अ‍ॅप ड्रॉवरमधून दुसरे अ‍ॅप निवडा.
अ‍ॅप्स स्वॅप करणे :

डिव्हायडर लाइनवर सहसा एक बटण असते, जे दाबल्यावर वरचे आणि खालचे अ‍ॅप्स एकत्र बदलले जातात.

एक्झिट स्प्लिट स्क्रीन: तुम्ही कोणते अ‍ॅप उघडे ठेवू इच्छिता यावर अवलंबून स्प्लिट-स्क्रीन मोडमधून बाहेर पडण्यासाठी डिव्हायडर लाईन स्क्रीनच्या वरच्या किंवा खालच्या बाजूला खेचून घ्या.

स्प्लिट स्क्रीन मॅनेज करा

आकार सेट करणे:

दोन अ‍ॅप्समध्ये काळ्या रंगाची दुभाजक रेषा आहे. ही लाईनवर किंवा खाली खेचून प्रत्येक अ‍ॅप विंडोचा आकार मॅनेज तुम्हाला करता येऊ शकतो.

अधिक वाचा:  Samsung Galaxy F55 5G: हा फोन झाला तीन हजार रुपयांनी स्वस्त जाणून घ्या काय आहे ऑफर !
लक्षात घेण्यासारख्या गोष्टी :

सर्व अ‍ॅप्स स्प्लिट-स्क्रीन मोडला सपोर्ट करत नाहीत. त्यामुळे अशावेळी काही अ‍ॅप्स त्याच्याशी सुसंगत नसल्याचा मेसेज तुम्हाला दर्शवू शकतात. तुमच्या अँड्रॉइड एडिशन आणि डिव्हाइस मॅन्युफॅक्चररवर अवलंबून अचूक स्टेप्स आणि इंटरफेस किंचित बदलू शकतात.

काही जुन्या अँड्रॉइड व्हर्जनमध्ये स्प्लिट स्क्रीन मोडमध्ये जाण्यासाठी तुम्हाला अ‍ॅप्सचे बटण दाबावे लागते.

स्प्लिट-स्क्रीन मोड प्रोडक्टिव्हिटी वाढविण्यासाठी एक उत्तम टूल आहे. यामुळे तुम्ही व्हिडिओ पाहताना वेब ब्राउझ करू शकता, व्हिडिओ कॉलदरम्यान नोट्स घेऊ शकता किंवा दोन अ‍ॅप्समधील माहितीची तुलना करू शकता. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या अँड्रॉइड डिव्हाइसवर हे फीचर्सचा प्रभावीपणे वापर करता येऊ शकतो.

अधिक वाचा:  Tech Tips: तुमच्या व्हॉट्सअप अकाउंटवर सुरक्षित आहे ? नसल्यास लगेच करा हे काम !