Samsung Galaxy F16 5G आज पासून विक्रीसाठी होणार सर्वत्र लॉन्च ; जाणून घ्या काय आहेत फीचर्स

Published on:

Follow Us

मागील काही दिवसांपूर्वीच सॅमसंग ने भारतीय बाजारात आपला हँडसेट केलेला आहे. Samsung galaxy f16 5G असे या हँडसेटचे नाव असून. आज पासून म्हणजेच 13 मार्च 2025 पासून या हँडसेट ची विक्री सुरू होणार आहे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर या हँडसेट ची विक्री करण्यात येणार आहे. आई प्रकारे परवडणारा 5g फोन असणार आहे.

Samsung galaxy f16 5G या हँडसेट ची विक्री दुपारी बारा वाजल्यापासून फ्लिपकार्ट वर सुरू होणार असून तथापि व्हेरियंट आणि त्यांच्या किमती बद्दल अद्याप तरी कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाहीये.

Samsung Galaxy F16 5G
Samsung Galaxy F16 5G
Samsung galaxy F16 5G स्पेसिफिकेशन्स :

या फोनमध्ये 6.7 इंचाचा Amoled डिस्प्ले बसवण्यात आलेला आहे, ज्यामध्ये यु आकाराचा नॉच बसवण्यात आलेला आहे. तसेच याच नॉच डिझाईन मध्ये सेल्फी कॅमेरा बसवण्यात आलेला आहे. यासोबतच Fhd+ रिझोल्युशन, 90Hz रिफ्रेश रेट व 800Nits पीक ब्राईटनेस देण्यात आला आहे.

बॅटरी :

या फोनमध्ये 5000 एम ए एच बॅटरी तसेच 25w चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच साईड फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर देखील देण्यात आला आहे.

कॅमेरा सेटअप :

या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप बसविण्यात आलेला आहे. आणि त्यामधील प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल चा ठेवण्यात आला आहे. यासोबतच दुय्यम कॅमेरा पाच मेगापिक्सेलचा अल्ट्राव्हाइड अँगल लेन्स व दोन मेगापिक्सल चा मॅक्रो कॅमेरा सेंसर बसवला आहे त्याचप्रमाणे सेल्फी कॅमेरा तेरा मेगापिक्सेलचा बसवण्यात आला आहे.

प्रोसेसर :

Samsung Galaxy F16 5G हँडसेट मध्ये Dimensity 6300 चा चिपसेट देण्यात आलेला आहे. त्यासोबतच जास्तीत जास्त 8 जीबी रॅम अ आणि 128 जीबी स्टोरेज या फोनमध्ये देण्यात आले आहे. तसेच यामध्ये मायक्रो एसडी कार्ड देखील वापरता येते.