Health Tips: सकाळी उठल्यावर हे पाणी प्यायल्याने दिवसभर वाटणार ताजेतवाने आळस होणार गायब

Published on:

Follow Us

DailyNews24

Stay Updated With the Latest News Anytime, Anywhere!

आपण बघतोय की सध्याच्या युगात माणूस आपल्या कामात फारच मग्न झाला आहे. अशावेळी तो बऱ्याचदा आपल्या धावपळीच्या जीवनातशैलीत कुठेतरी आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. यामुळे काही काळानंतर त्याला बऱ्याच आजारांशी झगडावी लागते. त्यामुळे निरोगी आरोग्य जगण्यासाठी प्रथमतः स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. एक प्रकारे ही आपली जबाबदारीच आहे. बऱ्याचदा अनेक लोक निरोगी राहण्यासाठी आणि आपल्या आरोग्य टिकवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. म्हणूनच आजच्या लेखात आम्ही ज्या काही गोष्टी उपाय सांगणार आहोत त्या नक्कीच तुम्हाला निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत.

Health Tips
Health Tips

चिया बियांचे पाणी आणि मध, हे मिश्रण वजन कमी करण्यासाठी तसेच पचन सुधारण्यासाठी आणि त्वचेचा निखार वाढवण्यासाठी अतिशय उपयोगी ठरते. चिया बिया ह्या पोषक तत्वांनी भरलेल्या असतात. ज्यामध्ये फायबर, ओमेगा-३ फॅटी आम्ल, प्रथिने, अँटीऑक्सिडंट्स व मिनरल्स आढळतात. आणि हे घटक आपल्या शरीरासाठी अतिशय उपयोगी ठरतात. ते शरीराच्या एकूण कार्यक्षमतेत सुधारणा आणण्याचे काम करतात. आपल्या आहारात च्या बियांचा नियमित समाविष्ट केल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

जर एखाद्या व्यक्तीला वजन कमी करायचे असेल तर त्याने चिरा बियांचे पाणी जरूर घ्यावे. चिया बियांमध्ये असणारे उच्च फायबर आपल्या पचनसंस्थे करिता गुणकारक ठरतात. आणि म्हणूनच आपले पोट अधिक वेळ भरल्यासारखे जाणवते. आणि सतत खात राहण्याची इच्छा रोखण्यास मदत करते. शरीराला अधिक चरबी असणाऱ्या व्यक्ती साठी हे अतिशय फायद्याचे ठरते. हे पाणी विशेष करून, सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने , शरीराला दिवसभर पुरेपूर ऊर्जा मिळण्यास मदत होते.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी :

ज्या व्यक्तींना मधुमेह किंवा रक्तातील साखरेच्या असंतुलनाची समस्या आहे, त्यांनी देखील चिया बियांचे पाणी आणि मधाचा समावेश आपल्या आहारात केलेला कधीही चांगला आहे. मधामध्ये नैसर्गिक गोडवा असल्यामुळे ते साखरेच्या पातळीवर अनुकूल परिणाम करते आणि शरीराला आवश्यक पोषण देण्यास देखिल मदत करते.

पचनसंस्था सुधारण्यासाठी गुणकारक

पचन संस्था व्यवस्थित असल्याने चांगले आरोग्य टिकवण्यासाठी मदत होते. चिया बियांमुळे आतड्यांचे कार्य सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी मदत होते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात आणि गॅस, ऍसिडिटी तसेच अपचनासारख्या समस्या वर नियंत्रण आणता येते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत

चिया बिया आणि मधाचे सेवन केल्याने सतत आजारी पडणाऱ्या किंवा कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी मदत होते. चिया बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे जे काही शरीरातील अनेक कारक असणारे घटक असतात ते नष्ट होतात. हे पेय नियमित घेतल्यास शरीर अधिक तंदुरुस्त आणि निरोगी राहते.

शरीरातील ऊर्जा वाढवण्यास मदत :

चिया बिया आणि मधाचे सेवन केल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा प्रदान होते. आणि सकाळी उठल्यावर हे पेय घेतल्याने दिवसभर ताजेतवाने आणि उत्साह टिकून राहण्यास मदत होते. जे लोक व्यायाम करतात त्यांनी प्रिवर्कआउट म्हणून हे नैसर्गिक एनर्जी ड्रिंक वापरल्यास त्यांना देखील याची नक्कीच मदत होते.

चिया बियाणे मधाचे पाणी असे बनवावे :

सर्वप्रथम तुम्ही एका ग्लासात पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा चिया बिया घालून ते १०-१५ मिनिटे तसेच ठेवावे, जेणेकरून त्या बिया पाण्यात भिजू शकतील.

नंतर आता चिया बिया पूर्णपणे व्यवस्थित फुलल्यानंतर त्यात एक चमचा नैसर्गिक मध मिसळावा.

आता तुमचे हे पेय पिण्यासाठी तयार झाले असेल. हे मिश्रण रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने वरील प्रमाणे सांगण्यात आलेले फायदे तुम्हाला दिसू शकतात.

Dailynews24 App Download

Dailynews24 App :

देश, शिक्षण, मनोरंजन, व्यवसाय अपडेट्स, धर्म, क्रिकेट, जन्मकुंडली याबद्दलच्या ताज्या बातम्या वाचा आणि दररोजच्या हिंदी बातम्या आणि व्हिडिओ लघु बातम्या कव्हरेजसाठी येथे डाउनलोड करा.

×
Open App
Responsive Sticky Footer Ad (70px Height)