तर मंडळी तुम्ही सुद्धा नवीन कार घेण्याच्या विचारात असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. आपल्याला माहित असेलच की, ब्रिटिश ऑटोमेकर एमजी मोटर्स कंपनी भारतीय बाजारपेठेत अनेक सेगमेंटमध्ये आयसीई आणि ईव्ही कार विक्रीचे काम करत आहे. या महिन्यात कंपनीने ग्राहकांना चांगल्या ऑफर्स देण्याचे ठरवले आहे. चला तर मग जाणून घेऊयात एमजी आपल्या गाड्यांवर किती डिस्काउंट देत आहे.

JSW MG Comet EV वर किती सूट मिळणार ?
नवी कार खरेदी करणाऱ्यांसाठी खरोखरच एक आनंदाची बाब ठरू शकते कारण, देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक Comet EV वर ४५ हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, हे डिस्काउंट २०२४ मॉडेल्सवर दिले जात आहे. याशिवाय, जर तुम्ही २०२५ मॉडेल खरेदी केले तर कंपनी यावर देखील तुम्हाला, ४० हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर देणार आहे.
JSW MG Astor वर सुद्धा होणार बचत :
जेएसडब्ल्यू एमजी मोटर्स कंपनीची मीड-साईज एसयूव्ही म्हणून असणारे अॅस्टर देखील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. तसेच कंपनीने मार्च महिन्यात या कारवर १.४५ लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट ठेवला आहे. आणि ही ऑफर २०२४ च्या मॉडेलवर ठेवण्यात आली आहे. तसेच जर तुम्हाला २०२५ चे मॉडेल खरेदी करायचा विचार असेल, तर तुम्हाला ७० हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जाईल असे कंपनीकडून सांगितले जात आहे.
MG ZS EV वर देखील मिळणार इतक्या रुपयांचे डिस्काउंट !
बाजारपेठेत ,एमजी झेडएस ईव्ही ही एमजी इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून विकली जाते. या महिन्यात म्हणजेच मार्च २०२५ मध्ये ही एसयूव्ही ग्राहकांनी खरेदी केल्यास २.०५ लाख रुपयांपर्यंत बचत ते ऑफर द्वारे करू शकतात. आणि विशेष म्हणजे ही ऑफर या एसयूव्हीच्या २०२५ मॉडेलवर देण्यात येत आहे.
या गाडीवर मिळणार सर्वात जास्त ऑफर !
एमजी ग्लोस्टर ही एमजीची फूल साईज एसयूव्ही आहे. या महिन्यात म्हणजेच मार्च 2025 मध्ये , ही एसयूव्ही खरेदी केल्यावर तुम्हाला यावर ५.५० लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. आणि ही ऑफर त्याच्या २०२४ च्या मॉडेलवर मिळू शकते. म्हणजेच मार्च 2025 मध्ये तुम्ही २०२३ चे मॉडेल खरेदी केल्यावर तुम्हाला १ लाख रुपयांपर्यंतचा फायदा होणार आहे. आणि या सोबतच 2025 च्या मॉडेलवर ४ लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट ग्राहकांना देण्यात येणार आहे.
- Maruti Suzuki : मारुती सुझुकी घेऊन येणार 35KMPLमायलेजची नवीन हायब्रीड कार
- Tata Tiago : टाटा टियागो खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर !!