New Vehicle Buying Tips: होळीच्या मुहूर्तावर नवीन कार खरेदी करायची आहे ? तर थांबा ही बातमी नक्की वाचा

Published on:

Follow Us

आज सर्वत्र होळी रंगपंचमी सारखा आनंदाने साजरा होत आहे. या निमित्ताने जर तुम्ही नवीन कार किंवा बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर गाडीची डिलिव्हरी घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे खूप महत्वाचे ठरते. अथवा तुम्हाला नंतर आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. आजच्या या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या आर्थिक नुकसान रोखण्यापासून मदत करणार आहोत.

प्री-बुकिंगवेळी किंमत निश्चित करा.

अनेकदा तुम्हाला डीलर्सकडून तुम्हाला गाडी खरेदी करण्या आधी ती बुक करण्यास सांगितले जाते. परंतु असावी अशी गोष्ट लक्षात ठेवावी की, बुक करताना डिलिव्हरीच्या वेळी गाडीची किंमत जास्त नसावी. असे पाहायला गेले तर, भविष्यातील किमतीतील चढउतारांपासून ग्राहकांना संरक्षण मिळावे म्हणून प्री-बुकिंग केले जात असते.

डिलिव्हरीपूर्व तपासणी करावी :

वाहतुकीदरम्यान अनेकदा आपल्या वाहनांचे नुकसान होते. म्हणून, डिलिव्हरी करण्यापूर्वी वाहनाची व्यवस्थित तपासणी करून घ्या. जर तुम्हाला काही ओरखडे, डेंट्स किंवा नुकसान दिसले तर ते ताबडतोब बदलण्याची कंपनीकडे विनंती करावी.

अधिक वाचा:  Holi Car Care Tips: होळीच्या रंगात बसून आपल्या वाहनांचे कसे करावे संरक्षण ?

विविध शोरूम मध्ये जाऊन किंमत तपासा :

 

गाडी खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या किमती बद्दल वेगवेगळ्या शोरूम मध्ये जाऊन चर्चा करावी. कारण सणावारा दिवशी वेगवेगळ्या डीलरशिप वर वेगवेगळ्या ऑफर देण्यात येत असतात. त्यामुळे असे होऊ शकते तुम्हाला जे मॉडेल हवे आहे ती तुम्हाला एका शोरूम मध्ये कमी किमतीत तर दुसऱ्या शोरूम मध्ये जास्त किमतीत मिळेल.

अधिक वाचा:  SUV लव्हर्ससाठी मोठी बातमी Maruti Fronx आली भन्नाट लूक आणि पॉवरफुल इंजिनसह