याद्वारे डिझाईन करण्यात आलेल्या बोटाचे नाव Syntilay असे असून, या बुटाचे AI ने अंदाजे 70 % डिझाईन केले आहे. सोबतच बूटाच्या डिझाइन करिता AI ने अनेक यॉट ब्रिज आणि सायन्स फिक्शन आर्टिस्ट सिड मीड यांच्या डिझाइन्सपासून प्रेरित होऊन डिझाईन केली आहे. त्यानंतर बूट तीन विभागात तयार करण्यात आला आहे.
डिझाईन प्रक्रिया
बुटाचे डिझाईन करत्या वेळी AI ने डिझाइन कॉन्सेप्ट तयार केले होते . आणि त्यानंतर मानवी डिझाइनर्सन द्वारे आणि AI च्या मदतीने स्केच काढले गेले . आणि या सगळ्यानंतर मोठमोठ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सनरच्या मदतीने त्या स्केचेसला अंतिम 3D मॉडेलमध्ये रूपांतर करण्यात आले .

रीबॉकचे सह-संस्थापक वजो फॉस्टर असे म्हणाले की, Syntilay च्या मदतीने फुटवियर उद्योगात आम्ही नवीन तंत्रज्ञान आणि बदल स्वीकारण्याची संधी निर्माण करीत आहोत. पहिल्यांदाच AI तंत्रज्ञानाने बनवलेला हा बूट फुटवियर उद्योगात एक नवीन अध्याय जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्या एक्सक्लूसिव्ह डिझायनिंग, कस्टम फिटिंग तसेच 3D प्रिंटिंगच्या तंत्रज्ञानामुळे तो बूट अधिक खास आणि आकर्षक बनतो. भविष्यात हे नवे तंत्रज्ञान आणि हा आविष्कार फुटवियर आणि फॅशन उद्योगात मोठे बदल घडवून आणू शकतात.
सुरुवातीला फक्त मोजक्या जोड्यांमध्येच उपलब्ध असणार :
Syntilay बूट सुरुवातीला फक्त काही हजार जोड्यांमध्येच उपलब्ध करण्यात येणार आहे, ते यासाठी की, तो एक एक्सक्लूसिव्ह आणि उच्च-स्तरीय उत्पादन बनेल. कंपनीची या बुटाला घेऊन योजना भविष्यात AI-जनरेटेड गियर सेलिब्रिटीज, इन्फ्लुएन्सर्स आणि सामान्य ग्राहकांसाठी डिझाइन करण्याची आहे.
बूटाचा रंग आणि किंमत :
हा बूट ग्राहकांना काळ्या (ब्लॅक), निळ्या (ब्लू) , ओट, नारंगी (ऑरेंज) आणि लाल (रेड ) अशा पाच रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे हा बूट कस्टम-फिटेड करण्यासाठी एक खास स्मार्टफोन स्कॅनिंग अॅप वापरले जाते, ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या पायांचे योग्य माप घेतले जाते.
या बूटाची किंमत $149.99 म्हणजेच जवळपास 12,500 रुपये इतकी आहे.
- काय इंटरनेट होणार वेगवान! Jio नेही स्टारलिंक भारतात आणण्यासाठी स्पेसएक्सशी केला आहे करार
- 90 FPS Gaming करायची आहे; तर तुमच्यासाठी Realme ने केला हा धासू मोबाईल लॉंच!
- विवो ने लॉन्च केलाय 6500mAh बॅटरीसह आपला धमाकेदार स्मार्टफोन! काय असणार किंमत जाणून घ्या
- Redmi Turbo 4 pro : Redmi Turbo 4 pro चे स्पेसिफिकेशन आले समोर !
- Realme P3x: 8GB रॅम असणाऱ्या 5G फोनवर मिळतेय भन्नाट ऑफर ! जाणून घ्या इथे