अनेकदा आपण दुसऱ्या लॅपटॉप किंवा संगणकावरून व्हॉट्सअप अकाउंट लॉग इन करतो, परंतु नंतर लॉग आउट करायला विसरतो. तुमच्यासोबत सुद्धा असे घडले तर, लॉगआउट कसे करावे याबद्दल आपण आजच्या या बातमीमध्ये जाणून घेणार आहोत.

जगभरात ३ अब्जापेक्षा जास्त लोक व्हॉट्सॲपचा वापर करतात. आपल्याला माहिती असेलच की,व्हॉट्सअॅप एकाच वेळी अनेक उपकरणांवर वापरता येते, परंतु जर हे दुसऱ्या उपकरणांवर वापरायचे झाले तर, यावेळी काळजी घेणे फायद्याचे ठरते. नाही तर बऱ्याचदा त्याचा ऍक्सेस दुसऱ्या कोणाकडे जाऊ शकतो आणि तुमच्या चॅट्स, मेसेजेस, डॉक्युमेंट्ससह अनेक पर्सनल माहिती लीक केली जाऊ शकते.
संदेश लीक होऊ शकतात :
जर तुम्ही सायबर कॅफे किंवा आपल्या ऑफिसच्या ठिकाणी असणाऱ्या संगणकावर व्हॉट्सअॅप वापरत असाल तर, तुम्हाला अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. बऱ्याचदा लोक दुसऱ्या संगणकावरून त्यांच्या व्हॉट्सअॅप अकाउंटमध्ये लॉग इन करतात पण लॉग आउट करायला विसरतात. जर तुमच्यासोबतही असेच घडले असेल आणि तुम्हाला व्हॉट्सअॅप इतर सर्व डिव्हाइसेसवरून आपोआप लॉग आउट करायचे असेल, तर ही बातमी नक्कीच तुमची मदत करेल.
या फीचरचा वापर करा :
खरंतर, व्हॉट्सअॅपमध्ये लिंक्ड डिव्हाइसेस नावाचे एक फीचर आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट कोणत्या डिव्हाइसवर चालू आहे ते तुम्ही पाहू शकता.
लॉग आउट करा :
जर तुमचे व्हॉट्सअॅप तुम्ही वापरत नसलेल्या डिव्हाइसवर उघडे असेल, तर तुम्ही लॉग आउट करून ठेवू शकता. तुम्हाला एकामागून एक इतर उपकरणांमधून WhatsApp लॉगआउट करावे लागेल. यासाठी तुम्हाला WhatsApp च्या वरच्या उजव्या बाजूला तीन ठिपके दिसतील, त्यावर क्लिक करुन . त्यानंतर लिंक्ड डिव्हाइसेसवर क्लिक करावे. जर तुमचे खाते एखाद्या अज्ञात डिव्हाइसवरून लॉग इन केलेले असेल, तर तुम्ही त्यातून लॉगआउट करू शकता. लॉग आउट करण्यापूर्वी त्याचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा जेणेकरून तुम्ही भविष्यात तक्रारी इत्यादी नोंदवू शकाल.
- Samsung Galaxy F16 5G आज पासून विक्रीसाठी होणार सर्वत्र लॉन्च ; जाणून घ्या काय आहेत फीचर्स
- Spilt Screen: स्पिल्ट स्क्रीन मोड नक्की कसा वापरायचा
- Syntilay AI Shoes: AI चा नवा आविष्कार डिझाईन करण्यात आला बूट
- काय इंटरनेट होणार वेगवान! Jio नेही स्टारलिंक भारतात आणण्यासाठी स्पेसएक्सशी केला आहे करार
- 90 FPS Gaming करायची आहे; तर तुमच्यासाठी Realme ने केला हा धासू मोबाईल लॉंच!