आपल्या आरोग्यासोबतच त्वचेची सुद्धा विशेष काळजी घेणे फार गरजेचे असते. बदलत्या जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींचा आरोग्यावर तसेच त्वचेवर परिणाम होत असतो. त्यामुळे, त्वचा निरोगी ठेवण्याकरिता व्हिटॅमिन-ई चा वापर खूप फायदेशीर ठरू शकतो. तर आजच्या या लेखात आपण ग्लोइंग त्वचा मिळविण्याकरता व्हिटॅमिन ई चा कसे वापर करावा हे जाणून घेऊयात.

व्हिटॅमिन ई पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते यासोबतच निरोगी त्वचा वाढवते आणि पुनरुत्पादक आरोग्यास सुद्धा समर्थन देते. व्हिटॅमिन ई हे चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे आणि ते शरीरात साठवले जाते. असे असूनही, आहाराद्वारे व्हिटॅमिन ईचा पुरवठा अत्यंत आवश्यक आहे.
व्हिटॅमिन ई अँटी-ऑक्सिडंट म्हणून काम करते, जे त्वचा सुधारण्यास मदत करते. म्हणजेच त्वचेवरील काळे डाग कमी करते. तुमच्या स्किनकेअर रूटीनमध्ये व्हिटॅमिन ईचा समावेश केल्याने त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. आणि सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात. व्हिटॅमिन ई कॅप्सूल थेट फोडून चेहऱ्यावर लावता येत असले तरी, ते इतर अनेक प्रकारे देखील वापरले जाऊ शकते. ते कसे हे पाहुयात.
व्हिटॅमिन ई चा चेहऱ्यासाठी कसा वापर करावा :
व्हिटॅमिन ई कॅप्सूल फोडा. त्यात बीटरूटचा रस घाला. यामुळे गुलाबी रंग येईल, ज्याचा वापर ओठांना मऊ आणि गुलाबी ठेवण्यासाठी करता येईल.
व्हिटॅमिन ई कॅप्सूल मॉइश्चरायझरमध्ये मिसळून लावल्याने ते हायड्रेटिंग नाईट क्रीम म्हणून काम करते.
३ टेबलस्पून अॅलोवेरा जेल, ३ व्हिटॅमिन-ई कॅप्सूल आणि अर्धा टेबलस्पून गुलाबजल मिसळा आणि पेस्ट तयार करा. ते चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे तसेच राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे त्वचेला चमक येते आणि त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.
मुलतानी माती असो किंवा बेसनाचा फेसपॅक, व्हिटॅमिन-ई कॅप्सूल फोडा आणि ते तुमच्या फेसपॅकमध्ये मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. तथापि, तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा जास्त वापर टाळावा कारण त्यामुळे त्वचा तेलकट होते.
तुमच्या आहारात व्हिटॅमिन-ई समृद्ध असलेले पदार्थ समाविष्ट करा जसे की सूर्यफूल बियाणे, बदाम, हेझलनट्स, पालक, एवोकॅडो, शेंगदाणे, किवी, टोफू, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, लाल शिमला मिरची इत्यादी.
व्हिटॅमिन ईचा एक कॅप्सूल फोडा, त्यात बदाम मिसळा आणि डोळ्यांखाली लावा जेणेकरून काळी वर्तुळे दूर होतील.
- Holi Colour Remover From Face: होळी नंतर चेहऱ्यावरील रंगांचे डाग निघत नाहीत ? करा हे उपाय !
- Health Care Tips: वजन कमी होण्यासोबतच आणखी बरेच फायदे देणार फक्त या बिया पाण्यात भिजवून खाल्याने!
- Health Tips: सकाळी उठल्यावर हे पाणी प्यायल्याने दिवसभर वाटणार ताजेतवाने आळस होणार गायब
- Summer Face Oil: उन्हाळ्यात या तेलांचा वापर करून, ग्लोइंग त्वचेसाठी होणार मदत !