AR Rahman News: ए आर रहमान यांची प्रकृती बिघडली रुग्णालयात केले दाखल

Published on:

Follow Us

सर्वाधिक लोकप्रिय असणारे आणि बॉलीवूडचे दिग्गज संगीतकार आणि उत्कृष्ट गायक असणारे ‘एआर रहमान’ यांच्या बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. गायक ‘ एआर रहमान’ यांची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची अचानक प्रकृती कशी बिघडली? याबद्दल आपण आजच्या बातमीतून आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

‘ ए आर रहमान’ यांना नेमके काय झाले ?

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार संगीतकार ‘ एआर रहमान’ यांच्या अचानक छातीत दुखत असल्याची तक्रार केली असल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळाली आहे. परंतु त्यांच्या प्रकृती विषयी अधिक माहिती अद्याप मिळू शकली नाही. मात्र ‘ एआर रहमान’ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे त्यांचे चाहते सध्या चिंतेत असल्याचे दिसत आहे.

‘ एआर रहमान’ यांच्याबद्दल :
AR Rahman News
AR Rahman News

संगीताचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ एआर रहमान’ यांना लहानपणापासूनच संगीताची प्रचंड आवड होती. लहानपणापासूनच त्यांनी अनेक वाद्य वाजवायला शिकले होते. तर वयाच्या चौथ्या वर्षीपासून त्यांनी पियानो वाजवायला सुरुवात केली होती. त्यांचे वडील ‘आर के शेखर’ हे तमिळ आणि मलयालम चित्रपटातील म्युझिक कंपोजर होते. ए आर रहमान यांनी आपल्या वडिलांना असिस्ट करीत लहानपणापासूनच आपल्या करिअरची सुरुवात केली. परंतु ए आर रहमान नऊ वर्षाच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी आणि शिक्षण पूर्ण करीत त्यांनी आपली संगीताची आवड जपली आणि ती पुढे जोपासत आणली.

संगीताचा बादशाह म्हणून ओळखला जाणाऱ्या ए आर रहमान यांना मिळाले आहेत अनेक पुरस्कार :

AR Rahman News

ए आर रहमान यांनी संगीत क्षेत्रात उत्कृष्ट प्रगती केली आहे. आणि त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ए आर रहमान यांना ऑस्कर सोबतच राष्ट्रीय पुरस्कार तसेच गोल्डन ग्लोब आणि ग्रॅमी पुरस्कार अशा अनेक मोठमोठ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

अधिक वाचा:  Ashok Saraf: मराठी माणसाने हिंदी सिनेमात, नोकर आणि गडी असलेच छोटे रोल काय म्हणाले अशोक सराफ ?

Read More:

Hindi Movies Part 2: येणाऱ्या दिवसात या चित्रपटांचे 2 भाग येणार !

Adah Sharma On Marriage: लग्नाबद्दल अदा शर्मा काय म्हणाली

Chhaava Box Office Collection Day 25 : छावा सिनेमाने पंचविसाव्या दिवशी केली इतकी कमाई